मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण वा पश्चिम महाराष्ट्र असेल. सगळ्या भागात भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे. तसेच लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनही भाजप एक नंबरला येत यावरुन हेच दिसत असल्याचे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं असल्याचे एका वृत्त वाहिनीला बोलताना म्हणाले.
“ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“लॉकडाउनच्या काळात पाठीशी उभे राहिलेले मोदी लोकांनी पाहिले, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर यांना मदत न करणारं सरकार पाहिलं. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतं यावरुन हेच दिसतं,” अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
* चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न
चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले की, “असं होत असतं, आती मी जयंत पाटील सासूरवाडीत जिंकू शकले नाही अशी बातमी पाहिली, तिथे राष्ट्रवादी हारली. एखाद्या गावात कमी अधिक होत असतं. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी कौल भाजपाच्या बाजूने दिला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत चांगलं यश मिळालं आहे. एखाद्या गावात काय झालं हे महत्वाचं नाही पण एकूण कौल भाजपाला मिळाला आहे”
* उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात
“शिवसेना पॅन महाराष्ट्र पक्षच नाही. ग्रामपंचायतीत आम्हाला तिन्ही पक्षांसोबत लढावं लागलं. या तिन्ही पक्षांच्या आपल्या जागा असून तिथे ते मजबूत आहेत. भाजपाचं मात्र तसं नाही, भाजपा आज पूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळेच आमच्यासाठी जागा मोठी असून ती आम्ही व्यापत आहोत,” असंही ते म्हणाले. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेला असतो. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो, सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
When someone writes an post he/she retains the thought of a user in his/her brain that how a user can know it. So that’s why this article is outstdanding. Thanks!|
magnificent issues altogether, you simply received a emblem new reader. What could you recommend in regards to your publish that you just made a few days in the past? Any certain?|
Very shortly this site will be famous among all blog viewers,
due to it’s nice posts
Wonderful article! This is the type of information that should be shared around the internet.
Disgrace on Google for not positioning this post higher!
Come on over and discuss with my web site . Thanks =)
The Timeform Expert decision in every race.
Feel free to visit my webpage; Bookmarks
I used to be able to find good info from your blog posts.
I am only writing to let you be aware of what a excellent discovery my cousin’s girl developed using your blog. She even learned a lot of details, not to mention what it’s like to possess a marvelous helping spirit to have most people effortlessly know specific grueling subject matter. You really surpassed my desires. I appreciate you for presenting these effective, dependable, revealing not to mention fun tips on that topic to Lizeth.
WOW just what I was searching for. Came here by searching for judi slot
joker deposit pulsa
Superb, what a blog it is! This web site presents helpful information to us, keep it up.