मुंबई : मुंबईतील गुन्हे पथकाने मोठी कारवाई केली आहे. नवजात चिमुकल्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 जणांना अटक केली आहे. यात एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन आणि सहा एजंट्सचा समावेश आहे.
मुंबईतील गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत मुलांना विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांनी कारवाई करत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलंय. यामध्ये पॅथलॉजी लॅबच्या टेक्निशियनचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना नवजात मुलीसाठी साठ हजार रुपये, मुलासाठी दीड लाख रुपये दत्तक देण्यासाठी देऊ करत असल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक तपासात या गँगने गेल्या सहा महिन्यात चार नवजात बालकांना विकल्याचे संशय आहे. मात्र, पोलिसांना यामध्ये आणखीन जास्त नवजात बालके विकले गेल्याचा संशय आहे.
शनिवारी मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरती सिंग, रुपाली वर्मा, रुश्कर शेख, निशा अहिरे, हिना खान, गीतांजली गायकवाड, शाहजहान जोगिलकर आणि संजय पदम यांना अटक केली आहे. यातील सिंग आणि वर्मा हे एजंट म्हणून काम करत होते, तर खान आणि अहिरे हे सब एजंट म्हणून काम करायचे असं पोलिसांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी आठही जणांचे फोन ताब्यात घेतले आहेत. या फोनमधून पोलिसांनी संबंधित टोळीने काहींशी WhatsApp च्या माध्यमातून साधलेले संवाद आणि काही फोटो देखील हस्तगत केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे कॉल डिटेल्स आणि फोनमधील इतर रेकॉर्ड देखील हस्तगत केले आहेत. या सर्वांवर IPC अंतर्गत मानवी तस्करी आणि बाल न्यायिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्वेतील एका महिलेने आपल्या अपत्याला विकल्याचे खात्रीशीर माहितीनंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या सब इन्स्पेक्टर योगेश चव्हाण आणि मनीषा पवार यांनी कारवाई करत हे रॅकेट उध्वस्त केलं आहे.
4 जानेवारी रोजी पोलिसांनी शेख, जोगिलकर आणि वर्मा यांना पकडले आणि क्रॉफर्ड मार्केट येथील पोलिस मुख्यालयात असलेल्या युनिट 1 च्या कार्यालयात त्यांची चौकशी केली. शेख यांनी पोलिसांना सांगितले की 2019 मध्ये वर्माने एका नवजात मुलीला साथ हजारांना विकण्यासाठी मदत केली होती, नुकतीच त्यांनी एका नवजात मुलाला दीड लाखात विकण्यासाठी मदत केलेली. जोगिलकर यांनी सांगितले की तिनेही आपल्या नवजात मुलाला धारावी येथील एका कुटुंबात 60,000 रुपयात विकले होते. वर्मा यांच्या चौकशीदरम्यान खान आणि अहिरे यांची नावं उगळली आहेत. त्यानंतर पोलिसांनी जोगिलकर यांचा मुलगा पदमला दीड लाखात विकल्याचं कबूल केलं आणि खानला अटक केली. त्यानंतर पदम यालाही पकडण्यात आले.