नवी दिल्ली : केंद्र सरकारनं थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षीपासून ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला झाला होता. केंद्र सरकारकडून आज मंगळवारी नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली जाणार आहे.
पराक्रम दिवस साजरा करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आणि कार्यपद्धती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या वर्षानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. यामद्ये इतिहास अभ्यासक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परिवारातील सदस्य आणि आझाद हिंद सेनेतील काही सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे. नवी दिल्ली, कोलकाता आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित ठिकाणी जंयतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शुभारंभ 23 जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक ‘विक्टोरिया मेमोरियल हॉल’ येथून करतील. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा कोलकात्याच्या दौऱ्यावर असतील. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी चित्रा घोष यांच्या निधनावर आदरांजली अर्पण केली होती. नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शौर्य सर्वांना माहिती आहे, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.
Thanks for finally writing about > नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा,
केंद्राचा निर्णय – Surajya Digital < Loved it!
This site really has all of the information I needed about this subject and didn’t know who to ask.
My web blog :: Robin of the wood
Hello my family member! I want to say that this article is awesome, nice written and include almost all significant infos.
I’d like to see extra posts like this .
With phishing these scams getting into to pay attention to taxes challenges, you might acquire messages on the subject of any and all facets of taxation refunds.
As I website possessor I conceive the content material here is very excellent , thankyou for your efforts.