सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 18 मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.
गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सूरतच्या पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करत असून सर्वचजण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.