नवी दिल्ली / मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा एवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही.. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, असेही सोमय्या यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा एवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरीही दूसऱ्या विवाहाची माहिती धनंजय मुंडेंनी लपवली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला यांचं स्पष्टीकरण द्यावच लागेल, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या सध्या दिल्लीमध्ये असून त्यांनी दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाचीही भेट घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
तत्पूर्वी, धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वेळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.