चेन्नई : नागपूरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. ‘निकरवाले नाही तर तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.
तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर तुफान हल्लाबोल केलाय. ‘तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल’, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने ज्या प्रकारे भारताचं अध:पतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताचा पायाच नष्ट करायचाय. आपण सगळे मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढू’, अशी साद राहुल गांधींनी यावेळी जनतेला घातली.
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत या विषयावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याऐवजी सरकार त्यांना दहशतवादी ठरवून मोकळं होत आहे. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.
* ‘मन की बात’वर सडकून टीका
‘मन की बात’ सांगायला आलो नाही ऐकायला आलोय…,मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी… मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली ‘मन की बात सांगण्यासाठी…’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या ‘मन की बात’वर सडकून टीका केली.
* केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
यंदाच्या वर्षीच तामिळनाडू विधानसभेची निवडणूक तामिळनाडू विधानसभेची निवडणूक याच वर्षी आहे. 2016 साली पाठीमागची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आता 2021 म्हणजे याच वर्षी इथे निवडणूक पार पडणार आहे. राहुल गांधी तीन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. 23 जानेवारीला त्यांचं तामिळनाडूत आगमन झालंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत या विषयावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याऐवजी सरकार त्यांना दहशतवादी ठरवून मोकळं होत आहे. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.. यामुळे आतापासूनच नेतेमंडळींनी प्रचाराला सुरुवात केलीय.