भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावर एका महिलेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेत मोठा गोंधळ घातला. ‘मी राहुल गांधी यांना भेटायला जात आहे, मी त्यांची होणारी पत्नी आहे, त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी मी जात आहे’, असे या महिलेने म्हटले. मात्र या महिलेजवळ तिकीट नव्हते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने चांगलाच गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. या महिलेने घातलेला गोंधळ पाहून या प्रवेशद्वाराजवळ बघ्यांची गर्दी जमा झाला. विशेष म्हणजे या महिलेकडे विमानाचे कोणतेही तिकीट नसताना तिला विमानतळावर प्रवेश करायचा होता. तिकीट नसलं तरी बरंच सामान घेऊन ही महिला विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षकांनी या महिलेचं काहीही ऐकून न घेता तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. या महिलेने सुरक्षारक्षकांना मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला जात असून त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे, असं ही महिला सांगू लागली. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सारे लोकं मला सलाम कराल, असंही ही महिला सुरक्षारक्षकांना म्हणाली.
सुरक्षारक्षकांनी बऱ्याचदा समजावूनही या महिलेने गोंधळ सुरुच ठेवल्याने अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपुरा येथील रहिवाशी असल्याचं समजलं. पोलिसांनी या महिलेच्या नातेवाईकांना शोधून काढलं. तपासामध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली. मागील काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालते असंही पोलिसांना समजलं.