नवी दिल्ली : अयोध्येत बांधल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी भाविक त्यांच्या क्षमतेनुसार दान देत आहेत. धनाढ्य लोक लाख – कोटीत दान देत आहेत हे समजण्यासारखे आहे. पण एका फक्कडबाबा नावाच्या साधूने तब्बल एक कोटीचे दान केले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
या फक्कडबाबा साधूबाबाचे ऋषिकेश येथील स्वामी शंकर दास (वय ८३) असे नाव आहे. ६० वर्षांपासून हे फक्कडबाबा गुहेत राहत आहेत. यांनी मंदिरासाठी एक कोटी रुपये दान दिले आहेत. लोक त्यांना ‘फक्कडबाबा’ या नावाने सर्वांना परिचित आहेत. फक्कडबाबा हे टाटावालेबाबांचे शिष्य म्हणून गुहेमध्ये राहतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फक्कडबाबा गुरुवारी ऋषिकेशमधील स्टेट बँक ऑफ इंडियामधील शाखेत पोहचले आणि राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी म्हणून एक कोटीचा चेक बँक कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केला. गुहेमध्ये राहणाऱ्या बाबांनी एक कोटीचा चेक दिल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे खाते तपासले. त्यांच्या खात्यात एक कोटीहून अधिक रुपये आहेत. फक्कडबाबांनी आपल्या आयुष्यभराची कमाई राम मंदिराच्या उभारणीच्या कार्यासाठी दिली. ते म्हणाले, माझ्या आयुष्याचा हेतू आज पूर्ण झाला.
टाटावालेबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून दान मिळालेले पैसे जमा करून राम मंदिरासाठी दान केलेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ऋषिकेशमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला ही माहिती दिली. संघाचे स्थानिक कार्यवाहक कृष्णकुमार सिंघल यांनी बाबांकडून चेक घेऊन तो राम मंदिराच्या खात्यावर जमा केला. फक्कडबाबांना राम मंदिरासाठी हे दान ‘गुप्तदान’ म्हणून द्यायचे होते. मात्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बाबांना फोटो काढण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी चेक देतानाचा फोटो काढून घेतला.