नवी दिल्ली : शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, त्यांना तेथून उठवण्यात यावं. कोणतंही आंदोलन हे संविधानिक पध्दतीने झाले पाहिजे. २६ तारखेच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकरी अत्यंत हिंसक झाले. या सर्व प्रकारात दिल्लीचे पोलिस आयुक्त हे पूर्णतः असक्षम असल्याचे दिसले. लोकांचे आणि स्मारकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी निमलष्करी दले दिल्लीत तैनात करण्यात यावी यासाठी धनंजय जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चाचा ठरलेला मार्ग सोडून आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक मारली. तिथे या आंदोलकांनी सुरक्षा भेदत किल्ल्याच्या दर्शनी भागावर शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला. या सर्व प्रकारात अनेक शेतकरी व पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर आता शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत त्यांना तेथून उठवण्यासाठी धनंजय जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचिकाकर्ते धनंजय जाधव यांनी अस म्हंटल आहे की, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचे आंदोलन चालू आहे. २६ तारखेच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकरी अत्यंत हिंसक झाले. कोणतंही आंदोलन हे संविधानिक पध्दतीने झाले पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यात शेतकरी प्राणघातक शस्त्रे, काठ्या, तलवारी घेऊन दिल्लीत पोहोचले व पोलिसांवर देखील हल्ले केले गेले. या सर्व प्रकारामुळे प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले असून शहराची कायदा सुव्यवस्था व शांतता विस्कळीत झाली.
त्याच सोबत दिल्ली पोलोसांची अकार्यक्षमता देखील पहावयास मिळाली. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली. आंदोलकांवर पोलिसांना नियंत्रण आणता आलं नाही. आंदोलन पोलिसांच्या नियंत्रणा बाहेर गेले होते. या सर्व प्रकारात दिल्ली पोलिस आयुक्तांनी स्वत: ला पूर्णत: असक्षम असल्याचे दाखवले आहे. लोकांचे तसेच स्मारकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी निमलष्करी दले दिल्लीत तैनात करण्यात यावी, अशी मागणी देखील याचिकाकर्ते जाधव यांनी यावेळी केली आहे.