मुंबई : मुंबईतील भाजप नेते व माजी काँग्रेस आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हेगडे यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी मंत्री, अनिल परब, वरुण सरदेसाई हेही उपस्थित होते. दरम्यान, कृष्णा हेगडे विले पार्लेतून काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला व आज ते शिवसेनेत गेले.
मुंबईत भाजपाला एक झटका बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत, आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन हाती बांधून घेत, खांद्यावर शिवसेनेचा भगवा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही काळापासून ते भाजपात अस्वस्थ असल्याचं दिसून येत होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कृष्णा हेगडे हे आता भाजपामध्ये येण्याअगोदर ते मूळचे काँग्रेसचे आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी, काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली भाजपाच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर तीन वर्षांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे ते जावई आहेत.
* धनंजय मुंडे प्रकरणात आणला होता ट्वीस्ट
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर, कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची देखील मागणी केली होती. एवढच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचंही हेगडे यांनी सांगितलं होतं.