मुंबई : बॉलिवूडमधील काही कलाकारांनी शेतकरी आंदोलना संदर्भात आणि यामुळे सुरु झालेल्या वादाबाबत उघडपणे भूमिका घेतली आहे. मात्र अनेक मोठे कलाकार या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्धीन शाह यांचा मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पंजाबचा सिंगर जॅझी बी याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शाह यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना झापलं आहे.
दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणातील शेतकरी मागील ७२ दिवसांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत आणि पावसातही शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. परदेशातील समाजकार्य करणाऱ्या सेलिब्रेटींनीही शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. यावरुन भारतातील अभिनेते-अभिनेत्र्यांनी परदेशी समर्थनाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्धीन शाह यांनी समर्थन दिले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नसरुद्दीन शाह यांनी जमील गुलरेज यांना दिलेली मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलत असल्याचे दिसत आहे. नसरुद्दीन शाह यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, जेव्हा सगळे उध्वस्त झाले असेल तेव्हा तुमच्या शत्रुंचाही आवाज येणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांची शांतता पण जास्त त्रास देईल. मला काही फरक पडत नाही. असे बोलूनही चालणार नाही. जर शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. तर मला काही फरक पडत नाही असे बोलू शकत. परंतु मला खात्री आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढेल तीव्र होईल. आणि सामान्य जनताही यामध्ये सहभाग घेईल. शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे. असे नसरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्र्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक सेलिब्रेटींनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्यावरही नसरूद्दीन शाह यांनी टीका केली आहे. सिनेसृष्टीत मोठं-मोठे दिग्गज शांत आहेत. कारण त्यांना भिती आहे की, त्यांनी काही वक्तव्य केले तर खुप काही गमावू शकतो. जर अमाप पैसा कमवला आहे. तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढे कमावले आहे तर तुम्ही किती गमवाल? असा प्रश्न नसरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे.