नवी दिल्ली : आर्सेलर मित्तल या जगातील सर्वात मोठ्या या स्टील कंपनीची सूत्रे एका तरुण उद्योजकाच्या हाती जाणार आहेत. कंपनीचे फायनान्स चीफ आदित्य मित्तल यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2009 मध्ये फॉर्च्यून मॅगझीनच्या “40 under 40” यादीत ते चौथ्या क्रमांकावर होते. आदित्य यांचे वडील लक्ष्मी निवास मित्तल यांची जागा घेतील. कंपनीत मित्तल कुटुंबाची 35 टक्के भागीदारी आहे.
जगातील सर्वात मोठ्या आर्सेलर मित्तल या स्टील कंपनीची सूत्रे एका तरुण उद्योजकाच्या हाती जाणार आहेत. कंपनीचे फायनान्स चीफ आदित्य मित्तल यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते त्यांचे वडील लक्ष्मी निवास मित्तल यांची जागा घेतील. लक्ष्मी मित्तल आता कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
आर्सेलर मित्तल कंपनीत मित्तल कुटुंबाची 35 टक्के भागीदारी आहे. लक्ष्मी निवास मित्तल यांनी 1976 मध्ये कंपनी सुरू केली होती. आदित्य यांनी 1997 मध्ये कंपनीचे कामकाज पाहणे सुरू केले होते. तेव्हापासून त्यांनी कंपनीच्या विविध फिल्डमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. सध्या त्यांच्याकडे कंपनीच्या प्रेसिडेंट आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाची जबाबदारी होती. ते 45 वर्षाचे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आदित्य यांचा जन्म 22 जानेवारी 1976 मध्ये झाला होता. त्यांचा जन्म भारतात झाला. मात्र, बालपण इंडोनेशियात गेलं. त्यांनी जकार्ता इंटरनॅशनल स्कूलमधून हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं. ते अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. अमेरिकेच्या पेनसिलवेनियाच्या व्हॉर्टन स्कूलमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी कंपनीत मोठं योगदान दिलं आहे. जानेवारी 2008 मध्ये त्यांची यूरोपियन बिझनेस लीडर ऑफ द फ्यूचर म्हणून निवड झाली होती.
आदित्य यांनी पद सांभाळताच काही मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनीत 1 अब्ज डॉलर कॉस्ट कटिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार कंपनीतून 20 टक्के कामगारांची कपात करण्यात येणार आहे. सध्या कंपनीत 1 लाख 90 हजार कामगार काम करत आहेत. ही कपात येत्या दोन वर्षात करण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्पादन वाढवण्याचा आणि कॉन्ट्रॅक्टरची संख्या कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
सध्या ते कंपनीचे विद्यमान ग्लोबल चीफ फायनान्शिअल ऑफिसरही असून कंपनीचे यूरोपमधील सीईओ सुद्धा आहेत. 2009 मध्ये फॉर्च्यून मॅगझीनने “40 under 40” च्या यादीत त्यांचा समावेश केला होता. त्यात ते चौथ्या क्रमांकावर होते. त्यांनी मेघा मित्तल यांच्याशी विवाह केला आहे. मेघा या जर्मन फॅशन कंपनी Escada च्या मालकीन होत्या. त्यांची प्री-वेडिंग कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झाली होती. त्यात अभिनेता शाहरुख खानने परफॉर्म केला होता.