मुंबई : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या पटेल यांच्या आर्थिक व जमीन व्यवहाराची चौकशी ईडी करणार आहे. यापुर्वीही पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तेव्हा पटेल चौकशीला गेले नव्हते. दरम्यान, इक्बाल मिर्चीचे ISI शी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात पुन्हा एकदा समन्स बजावला जाणार असून, त्यांना ईडी कार्यालयात आता हजेरी लावावी लागणार आहे. यापूर्वीसुद्धा प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात आला होता, मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती मिळालीय. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळेच ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं. या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.
दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची प्रचंड संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली होती.
ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात 9 डिसेंबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची कोर्टाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.