नवी दिल्ली : कुंभमेळा प्रतीकात्मक करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर जुना आखाडाने कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे. तथापि, कुंभमेळा आता केवळ प्रतीकात्मक राहणार आहे. कुंभमेळा 30 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. आखाडा परिषद, विश्व हिंदू परिषद आणि मार्गदर्शक मंडळ यांच्यात दिवसभर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
कुंभमेळा प्रतीकात्मक करावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जुना आखाडाने शनिवारी रात्री कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली. तथापि, कुंभमेळा आता केवळ प्रतीकात्मक राहणार आहे. कुंभमेळा ३० एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. तथापि, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उत्तराखंड सरकारने संत, मठप्रमुख यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जुना आखाडाने ही घोषणा केली. मार्गदर्शक मंडळ आणि संत यांच्यातील मतभेदांमुळे कुंभ मेळा प्रतीकात्मक करण्याच्या घोषणेला उशीर झाला.
"हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी" https://t.co/MGo6amzmq1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
आखाडा परिषद, विश्व हिंदू परिषद आणि मार्गदर्शक मंडळ यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि संत यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. आलोक कुमार हे स्वत: पॉझिटिव्ह आहेत. माध्यमांशी बोलताना आलोक कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुंभ प्रतीकात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
आता कुंभमेळा प्रतिकात्मक असावा – पंतप्रधान मोदी https://t.co/f4j3QGUIhJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वामी अवधेशानंद म्हणाले, ” पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाचं रक्षण हे पुण्य आहे. माझं धर्म परायण जनतेला आवाहन आहे, कोरोनाच्या स्थितीत कोव्हिड 19 नियमांचं पालन करा.
माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान का हम सम्मान करते हैं ! स्वयं एवं अन्यों के जीवन की रक्षा महत पुण्य है।मेरा धर्म परायण जनता से आग्रह है कि कोविड की परिस्थितियों को देखते हुए #COVID के नियमों का निर्वहन करें ! @narendramodi @AmitShah @TIRATHSRAWAT #KumbhMela2021 #कुम्भमेला https://t.co/zax1JA60nT
— Swami Avdheshanand (@AvdheshanandG) April 17, 2021
हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यानंतर निरंजनी आखाड्यानंही कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केलीय. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा संपवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, महात्मांना परत जाण्याची विनंती केली गेलीय. 17 एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.
* 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह
हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.