सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोलापूर येथे काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी मंगळवेढ्यातून सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा, पोलिसांनी लावली संचारबंदी #surajyadigital #solapur #MarathaReservation #सोलापूर #सुराज्यडिजिटल #संचारबंदी pic.twitter.com/3670JwrQwe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवेढा व सांगोल्यातून सोलापूर येथे जाणाऱ्या आंदोलकांना मंगळवेढा येथील सांगोला नाका, खोमनाळ नाका, बोराळे नाका, माचणूर, बेगमपूर, वाघोली, कामती, तिर्हे, बी.एम.आय.टी काॅलेज, देगाव गावाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामध्ये आंदोलकांच्या गाड्यांची तपासणी करून 4 आंदोलकांना सोडण्यात येत आहे. अशा आंदोलकांच्या गाड्यांना सोडावे, या मागणीसाठी आ. समाधान आवताडे हे आक्रमक झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चातील काही क्षणचित्रे, पोलिसांत आणि आंदोलकांमध्ये तणाव #solapur #MarathaReservation #सोलापूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nJcSZeRZYr
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
अवताडे व पोलीस यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. आ.आवताडे व त्यांच्या सोबत असलेल्या आंदोलकांना देगाव येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोरेगाव एस.आर.पी कॅम्प येथे नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याबरोबर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडूभैरी, संचालक राजेंद्र पाटील, गणेश गावकरे, भास्कर घायाळ, समाधान घायाळ, हर्षद डोरले, मोहन गोसावी, किशोर देशमुखे, देवीदास इंगोले, दिंगबर यादव, दिपक सुडके आदीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर – …संभाजीमहाराजांचं आक्राळ विक्राळ रुप दाखवायला लावू नका #surajyadigital #MarathaReservation #सुराज्यडिजिटल #solapur #संचारबंदी #सोलापूर pic.twitter.com/AmyXa4zgpS
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
* मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा, पोलिसांनी लावली संचारबंदी
सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी शहरात आज संचारबंदी लावली. आहे. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. गुन्हे दाखल झाले तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणारे सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.