सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी अकलूज, माळशिरस, माढा, टेंभुर्णी भागातील मराठा समाज बांधव सोलापुरातील मोर्चात सहभागी होण्यासाठी येत असताना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी टेंभुर्णी येथे आंदोलकांना अडविले. याच्या निषेधार्थ आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलने केली.
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.
मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी https://t.co/Tu0Vo2QeGv
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
आ. समाधान आवताडे यांना मंगळवेढा सोलापूर महामार्गावर तिर्हे येथे पोलीस अधिकाऱ्यांनी रोखले. यावेळी आ. समाधान आवताडे आक्रमक झाले. त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला. आम्ही शांततेत मोर्चात सहभागी होणार आहोत, तरीही पोलिसांची अडमुठी भूमिका पाहून आ. समाधान आवताडे संतप्त झाले. सोबत कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1411622815690723334?s=19
अक्कलकोट शहराबाहेर तसेच सोलापूर जवळील नवीन नाका येथेच मोर्चा अडविल्याने समाजाच्या रोषास मात्र सामोरे जावे लागले. अक्कलकोट वरून येणाऱ्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज बांधव यांच्या गाड्या अडविल्याने सर्वजण आक्रमक होत जागेवरच ठिय्या आंदोलन केले. तसेच आघाडी शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तब्बल दीड तास अडविल्यानंतर जास्तच आक्रोश वाढल्याने आता नवीन अक्कलकोट नाक्यावरून सर्वांना सोलापूर शहरात सोडणे सुरू केले. सर्वांना आपल्या गाड्या रुपाभवानी मंदिर जवळ लावून तिथून चालत पुणे नाका येथील संभाजीराजे चौकात जाण्यासाठी परवानगी दिल्याने सर्व जण आता रवाना झाले आहेत.
सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चातील काही क्षणचित्रे, पोलिसांत आणि आंदोलकांमध्ये तणाव #solapur #MarathaReservation #सोलापूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nJcSZeRZYr
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021