Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

स्वप्नील लोणकर आत्महत्या; ‘सरकारला पाझर फुटणार आहे की नाही ?

Surajya Digital by Surajya Digital
July 5, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
स्वप्नील लोणकर आत्महत्या; ‘सरकारला पाझर फुटणार आहे की नाही ?
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : परीक्षा पास होऊनही रखडलेल्या मुलाखतींमुळे नैराश्यातून पुण्यात स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या दुःखद घटनेचे अधिवेशनासह संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. आज पुणे, लातूर आणि इतर शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. स्वप्नीलला श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तसेच एमपीएससीच्या 3 हजार नियुक्त्या मुलाखती रखडल्याने संताप आणि आक्रोश व्यक्त केला.

स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे.
एमपीएससी कुणाच्या व्यथा ऐकून घ्यायला तयार नाही.
आणखी किती स्वप्निलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार आहोत. राज्य सरकार केव्हा लक्ष देणार आहे?
स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय विधानसभेत मांडला!#MonsoonSession #MPSC pic.twitter.com/RzSYFryMkU

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2021

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. “सगळं कामकाज बाजूला ठेवा पण एमपीएससीवर चर्चा व्हायलाच हवी. कारण आज राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनातील हा प्रश्न आहे. एमपीएससी आपल्या पावलाने चालतीय, तिला एका स्वप्निलने आत्महत्या केली काय, जगला काय आणि मेला काय… काहीही फरक पडत नाही…. एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे म्हणजे स्वैराचार नाही.. अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे मी सांगितले.#MPSC

(३/३) pic.twitter.com/PXrDfVREtg

— Ram Satpute (@RamVSatpute) July 5, 2021

‘ स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावले उचलणार आहे, हे जाहीर करावे, असे म्हटले. सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

समुद्रात लागली भीषण आग, पहा व्हिडिओ, 5 कोटीहून अधिक व्ह्युज https://t.co/M5vB25m9fc

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

एमपीएससीची कार्यपद्धती नव्याने ठरविण्याची आवश्यकता आहे, असंही फडणवीस म्हणाले. एमपीएससी च्या परीक्षेचा ,वेळा निकालाच्या वेळा स्ट्रिकली ठरवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. एमपीएससी संदर्भात राज्यभरात अनेक आंदोलने झाली त्यानंतर सरकारने काय केलं आणि आता सरकार काय करणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

‌महाराष्ट्र सरकारने MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दोन वर्ष घेतल्या नाहीत या कारणामुळे पुण्‍यातील फुरसुंगी येथील MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली .#JusticeforSwapnilLonkar pic.twitter.com/oK2aIVm3jk

— ABVP Pune (@ABVPPune) July 5, 2021

* राज्यभरात MPSC विद्यार्थी आणि ABVP पुन्हा रस्त्यावर

MPSC परीक्षा पास होऊनही रखडलेल्या मुलाखतींमुळे स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. यानंतर MPSC आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. पुणे, औरंगाबाद, लातूर आणि राज्यातल्या अनेक शहरात विद्यार्थ्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनी (ABVP) आंदोलन केले आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही MPSC विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

Tags: #SwapnilLonakar #commits #suicide #government #explode#स्वप्नीललोणकर #आत्महत्या #सरकारला #पाझर #फुटणार
Previous Post

पत्रकार परिषद झालीच नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला परंपरेला छेद

Next Post

ब्रेकिंग : शेलार, महाजनांसह भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन, 1 वर्ष बंदी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
ब्रेकिंग : शेलार, महाजनांसह भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन, 1 वर्ष बंदी

ब्रेकिंग : शेलार, महाजनांसह भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन, 1 वर्ष बंदी

वार्ता संग्रह

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697