मुंबई : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ सभागृहात झाला. अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली, असा आरोप सरकारतर्फे करण्यात आला तसेच आशिष शेलार, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार यांच्यासह एकूण 12 भाजपच्या आमदारांचे 1 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांना नागपूर मुंबईतील विधानभवनाच्या परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे मी सांगितले.#MPSC
(३/३) pic.twitter.com/PXrDfVREtg
— Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) July 5, 2021
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यातच महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. मला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या, असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटलं. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
पळपुट्यांचा रडीचा डाव…
माझ्यासह १२ आमदारांचे निलंबन…— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) July 5, 2021
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण विषयात अपयशी ठरलेल्या, दुध उत्पादक शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या, पीक विमा न देणाऱ्या, बोगस बियाणे देणाऱ्या, सोयाबीन, कापसाला मदत न करणाऱ्या…शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा @BJP4Maharashtra आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला. @Dev_Fadnavis pic.twitter.com/bGnPqxLDEo
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 5, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वप्नील लोणकर आत्महत्या; 'सरकारला पाझर फुटणार आहे की नाही ?, राज्यभरात MPSC विद्यार्थी आणि ABVP पुन्हा रस्त्यावरhttps://t.co/f0666EwAhA
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021
केंद्र सरकारने ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर एम्पिरिकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारतर्फे मांडण्यात आला होता.
'बँक ऑफ इंडिया'मध्ये खाते असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी करा 'हे' काम #BANKOFINDIA #bank #working #surajyadigital #सुराज्यडिजिटल #30Sep pic.twitter.com/VAnZSSe9yI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
हा ठराव मंजूर करण्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलाच संघर्ष झाल्याचं या अधिवेशनादरम्यान पाहायला मिळालं. या प्रकरणात विरोध करत असताना विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी सभागृहात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तसेच विरोध करत असताना काही आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निलंबनावरून सरकारवर जोरदार टीका करत ही फक्त एक कहानी रचून केलेली कारवाई आहे, असं म्हटलं आहे.
Mumbai: With accepting to provide empirical data (to Supreme Court) in the context of OBC reservation, the state government is just doing time pass. The govt is doing all this just to raise finger towards the Centre: Former Maharashtra CM & LoP Devendra Fadnavis pic.twitter.com/bjIsMJZqF3
— ANI (@ANI) July 5, 2021
* विधानसभेत जोरदार गोंधळ, भाजपचे हे 12 आमदार निलंबित
– आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावल, किर्तीकुमार बागडीया
– ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात गोंधळ झाला. नंतर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि गोंधळ केल्याप्रकरणी 1 वर्षांसाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले.