श्रीपूर : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एम.अजित कुमार यांना प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन कारखान्यास सन्मानित केले आहे. ही माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
विधानसभा तालिका अध्यक्षपदी काही क्षणा करता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याचा योग आला #MLA #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #politics #आमदार #प्रणितीशिंदे #विधानसभा #assembly pic.twitter.com/a9u5OpUwzI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
संपूर्ण भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासून ‘वन नेशन वन टॅक्स’ म्हणजेच सर्व देशासाठी एकच अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली. या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला, तिमाही, वार्षिक अशी विविध विवरणपत्रे बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात. अशाप्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी भरणा केलेली कराची रक्कम व उत्पादक कंपनी यांनी भरणा केलेली कराची रक्कम आणि दाखल केलेली विवरणपत्रे एकमेकाशी जुळावी लागतात, अन्यथा याचा परिणाम संस्थेला मिळणाऱ्या परतावा रकमेवर होतो. त्यामुळे विवरण पत्रामध्ये अचूकता येणे अडचणीचे होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओबीसी आरक्षण प्रश्नावर माढ्यात सकल ओबीसी समाजाचे चक्काजाम आंदोलन
https://t.co/QZdok9TGlB— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
तथापि श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सुरुवातीपासून संगणकीकरण आहे. त्यामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता आहे. त्याचाच परिणाम म्हणून ३१ मार्च २०२१ ला संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये जीएसटीद्वारे दाखल करण्यात आलेले सर्व ऑनलाइन विवरणपत्रे तसेच जीएसटी कराची रक्कम वेळेवर व बिनचूक अदा केले आहेत. यामुळे हा सन्मान झाला.
सोलापूर : बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा https://t.co/5HSsNrEEgQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी , कारखान्याचे चार्टर्ड अकौटंट शैलेंद्र जयस्वाल, चिफ अकौटंट रविंद्र काकडे,अकौंट विभागातील जीएसटी कर प्रणाली बाबत काम करणारा सर्व स्टाफ तसेच सर्व संचालक मंडळाचे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी अभिनंदन केले आहे.
संभाजीनगरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण, पुण्याच्या मुलावर संशय https://t.co/3Jedq22vMq
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021