सोलापूर : सोलापूरच्या ‘मार्शल लॉ’ वर आधारित 6 तासाची वेब सिरीज तयार करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सोलापुरात दिली.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचा सहभाग लक्षणीय आहे. त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर असे केले जाई. शोलापूर म्हणजे शोलोंका हुतात्माओंका शहर, असे काहीजण म्हणत १२ जानेवारी १९३० साली सोलापूर शहरातील मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे,कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्ताना ब्रिटिशांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले.
केंद्राच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान https://t.co/wqqlmbWiWP
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
होटगीत चिमरुडीसह मातेने केली आत्महत्या https://t.co/G5VxLpvnDZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर केले. सोलापूरचा हाच धगधगता इतिहास आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजच्या रूपात तयार केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन इनफॉटेनमेंट यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर, संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक यांच्या उपस्थितीत काल बुधवारी पत्रकार परिषद झाली.
आजपासून राज्यात पाच दिवस पावसाचा अंदाज #surajyadigital #rain #maharashtra #अंदाज #सुराज्यडिजिटल #5days pic.twitter.com/hgQmUrIuBz
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
राहुल सोलापूरकर यांनी या प्रकरणी अधिक माहिती देताना स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसिरीज तयार करण्यात येणार आहे. यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार असून त्यासाठी सोलापूरकरांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या फोटोला काय सुचवाल…
– मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; शिवसेनेवर नेम धरण्यासाठी.. #cabinet #surajyadigital #सुराज्यडिजिटल #rane #Modi #Shivsena #शिवसेना pic.twitter.com/jAiZsHH2GZ— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021