सोलापूर : 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना निमोनियाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये महागडे मिळणारे लस आता शासन पातळीवरून महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत दिली जाणार आहे.
तुमच्या मोदींनी लस पुरवठा केला नाही, मी काय खिशातून देऊ?, पालिका आयुक्तांचा लोकप्रतिनिधींना उर्मट सवाल https://t.co/aes0HrWbWu
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
या लसीकरणाचे प्रशिक्षण पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना काल गुरुवारी देण्यात आले. आता 12 जुलैनंतर ही लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. न्यूमोकोकल व कॉनज्युगेट लस या संदर्भात विशेष प्रशिक्षण जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. अमोल गायकवाड यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अकोला शहराजवळ भीषण अपघात; चौघे ठार https://t.co/t0W5vNZU1C
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
लहान मुलांमधील निमोनिया हा अतिशय चिंतेची बाब आहे. निमोनियामुळे 5 वर्षाच्या आतील मृत्यूचे प्रमाण सुमारे 28 टक्के आहे. एकूण 4 प्रकारच्या विषाणूमुळे निमोनियाची लागण होते. या पैकी 2 प्रकारच्या विषाणूवर आपण मात करू शकतो. 1985 नंतर टप्प्याटप्प्याने नवनवीन लसीचा समावेश नियमित लसीकरणामध्ये होत आहे. गेल्या 6 वर्षात आपण पेंटा, पोलिओची लस, रोटा व्हायरस लस आणि आता न्यूमोकोकल व कॉनज्युगेट वापरात येत आहे. दीड महिने, साडेतीन महिने व नऊ महिने पूर्ण झालेल्या बालकांना अनुक्रमे पहिली, दुसरी व बुस्टरची लस दिली जाणार आहे.
बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल https://t.co/qpaKnXQRMb
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
यापूर्वी ही लस फक्त खाजगी बालरुग्णालयात उपलब्ध होती. यासाठी 1 हजारपासून 4 हजार पर्यंत पैसे मोजावे लागत असे. सर्वसामान्यांना ही लस परवडणारी नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत लस दिली जाणार आहे. प्रिव्हिनार व न्यूमोसिल या दोन उत्पादन कंपन्यांकडून लसीचा नियमित पुरवठा होणार आहे.सोमवार, 12 जुलै रोजी या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. त्या नंतर लस मिळण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी अरुंधती हराळकर यांनी दिली.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021