मोहोळ : मागासवगीय विद्यार्थी महिला, मुली यांना संगणक प्रशिक्षण मिळावे व या उद्देशाने समाजकल्याण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोहोळ तालुक्यात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस
https://t.co/afeCK4jRWu— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
मागासवगीय विद्यार्थी महिला व मुली यांना संगणक प्रशिक्षण मोफत मिळावे या उद्देशाने शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत एमएससीआयटी व टॅलि हे प्रशिक्षण मोफत दिले जाते. परंतु मोहोळ तालुक्यातील संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी मोठा आर्थीक घोटाळा केला आहे. ही बाब कुरूल येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज चंदनशिवे यांनी माहितीच्या आधिकारात २०१५ पासूनची माहिती मागवल्याने ही बाब उघड झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डफरीन हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी डॉक्टर बाहेर, उपायुक्तांनी बजावली नोटीस https://t.co/WCOU6m1CJf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
यामध्ये जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व महिला बालकल्याण विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या याद्यामधून तिच तिच नावे पुन्हा पुन्हा आली आहेत. यावरून मोठा आर्थीक घोटाळा झाल्याचे उघड होत आहे. यातिल बऱ्याच विद्यार्थांना याबाबत काहीच माहित नाही. यातील विद्यार्थ्यांकडून संगणक प्रशिक्षण फी घेऊन ही त्या संगणक संस्थानी शासनाकडूनसुद्धा त्यांच्या नावे येणारी शैक्षणिक फी लाटली आहे.
तुमच्या मोदींनी लस पुरवठा केला नाही, मी काय खिशातून देऊ?, पालिका आयुक्तांचा लोकप्रतिनिधींना उर्मट सवाल https://t.co/aes0HrWbWu
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
यामुळे जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग संशयाच्या फेऱ्यात आला आहे. ज्यांनी तपासणी करुन गैरव्यवहार रोखायचे त्यांनीच त्यात सहभागी झाल्याचा संशय गरीब व गरजू पण यात फायदा होऊ न शकणाऱ्या लाभार्थांमधून व्यक्त होत आहे. म्हणजे कुंपणच जर शेत खायला लागल तर कसं होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग https://t.co/mYOoRTue7d
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021