स्वर्गीय राजेशअण्णा कोठे यांचा जन्म 14 जुलै 1966 साली जेष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे व स्वर्गीय कौशल्या काकू कोठे यांच्या उदरी झाला. ते त्यांचे कनिष्ठ सुपुत्र. त्यांचे बालपण जुनी मिल चाळ या ठिकाणी अत्यंत सामान्य परिस्थितीत गेले. लहानपणापासूनच अण्णांना आजूबाजूच्या लोकांमध्ये मिळून मिसळून वागण्याची सवय होती, त्यांच्या याच सवयीमुळे पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक जिवाभावाचे सवंगडी जोडले ते त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे आजही त्यांचे मित्र भेटले की, त्यांच्या आठवणी आणि मैत्री विशेष सांगतात. यावरून त्यांच्या मैत्रीचा धागा किती मजबूत आहे हे लक्षात येतं. अर्थातच अण्णांचे मित्रमंडळ मोठे होते.
चाळीतील सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.
त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरातील प्रसिद्ध हरीभाई देवकरण प्रशालेमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले. त्यांचं व्यक्तिमत्व देखणं रुबाबदार आणि कुटुंबवत्सल असं होतं. आपले कुटुंब कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, आप्तस्वकीय यांच्यामध्ये अण्णांचं विशेष असं स्थान होतं, माता – पित्याबरोबरच, ज्येष्ठ बंधू श्री. महेश अण्णा यांचा देखील ते मनस्वी आदर करत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ते आपल्या खांद्यावर पेलवत असत, पिताश्री स्वर्गीय तात्यासाहेबांचे खान-पान आणि तब्बेतीची ते विशेषकरून काळजी घेत असत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वर्गीय तात्यासाहेबांची घरातील एखादी महत्वाची कागदपत्रांची फाईल अथवा एखादी बाब जर सापडत नसेल तर अण्णा आपल्या स्मरणशक्तीने ते त्यांच्या लक्षात आणून द्यायचे.
Rajesh Kothe School Solapur. pic.twitter.com/pMSdtEAg2k
— Abhijeet Bashetti (@abhib_a) March 11, 2015
लहानपणी गरिबीचे चटके सहन केल्याने गरीबी काय असते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते गोरगरीब लोकांना मनापासून मदत करायचे. रात्री अपरात्री जरी कोणाला मदतीची गरज भासली तरी ते धावून जायचे स्वर्गीय तात्यासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा ते लोक – कार्याच्या माध्यमातून चालवायचे.
घरात राजकीय वातावरण असताना देखील ते स्वतःला राजकारणापासून थोडेसे अलिप्त ठेवून आपले वेगळे असे कार्य करायचे. स्वर्गीय तात्यासाहेबांच्या दरबारामध्ये कोणी एखादा व्यक्ती आपले काम घेऊन आला असता तात्यासाहेब जर नसतील अथवा त्याचे काम जर होत नसेल तर अण्णा स्वतः त्यामध्ये लक्ष घालून ते काम करत असत. हे त्यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण होते. त्यांच्या या वेगळ्या कार्यशैलीमुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती.
वेगळं असं काही नसून थोडस वेगळेपणान करणं, त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे लोक त्यांच्याकडून आपली कामे अगदी सहजतेने करून घेत असत. त्यांच्या या सहकार्याबद्दल लोक त्यांना मनातून दुवा देत असत, असं म्हणतात, नियत जिनकी अच्छी हो ! घर में मथुरा काशी हो!, ज्यांचं कर्म हे सत्कर्म असतं , त्यांच्या घरात सदैव सौख्य नांदत असतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज त्यांच्या परिवाराकड जर आपण पाहिलं, तर त्यांचे जेष्ठ सुपुत्र डॉ. सूर्यप्रकाश कोठे हे सोलापुरातील उदयोन्मुख पोट विकार तज्ञ( गॅस्ट्रो ॲन्टरालॉजिस्ट ) म्हणून नावारूपाला येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अनेक गरीब व गरजू रुग्णांना आपला सेवेचा व मदतीचा हात देऊन वडिलांच्या कार्याच्या वारशाचे जतन केले, त्यांचे कनिष्ठ सुपुत्र नगरसेवक श्री देवेंद्र दादा कोठे हे आपल्या राजकीय, सामाजिक, विकासात्मक व शैक्षणिक कार्याबरोबरच गोर-गरीब निराधारांसाठी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या स्मरणार्थ आत्मतृप्ती योजना चालवून या माध्यमातून त्यांना दोन वेळेच्या जेवणाचा डबा मोफत घरपोच देतात, मोफत आरोग्य शिबीरे रक्तदान शिबीरे, कोरोना महामारीच्या काळात हजारो कुटुंबांना मोफत धान्य वाटप, लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आयोजित शिबिरे, लसीकरण कार्यात उल्लेखनीय सहभाग आज आपल्या वडिलांच्या जयंतीचे औचित्य साधून या महामारीच्या काळातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशा अनेक लोककार्यातून ते आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या दैदिप्यमान कार्याचा वारसा जपत आहेत.
त्यांच्या जेष्ठ कन्या डॉ. सौ. राधिका ताई चिल्का- कोठे या साहित्यातील उच्च मानाच्या डॉक्टरेट पदवीधारक असून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कनिष्ठ कन्या सौ. धनश्रीताई विनायक कोंड्याल या देखील उच्च शिक्षण विभूषित असून विविध संस्था व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आहेत. त्यांचा हा पारिवारिक सौख्याचा आलेख पाहता स्वर्गीय अण्णांची पुण्याई व स्वर्गीय तात्यासाहेबांच्या आशीर्वादाचा महाप्रसादच म्हणावा लागेल.
आजचा दै. सुराज्य
http://epaper.surajyadigital.com/epaper.php &
visit us : www.surajyadigital.com
* दैनिक सुराज्य वर्तमानपत्राची निर्मिती
स्वर्गीय अण्णांना पत्रकारिता क्षेत्रात विशेष आवड होती म्हणून स्वर्गीय तात्यासाहेबांनी त्यांच्या इच्छेखातर त्यांचे स्मृती विशेष म्हणून दैनिक सुराज्य हे वर्तमानपत्र सुरु केले.
त्यांना शेतीचीही अतिशय आवड होती, शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा भर असायचा. विशेष करून द्राक्ष लागवड, द्राक्षाचे नवनवीन वाण यांची लागवड ते करत असत द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती.
जो आवडतो सर्वांना! तोचि आवडे देवाला! या काव्यपंक्ती प्रमाणे लोकांप्रमाणेच देवाला देखील त्यांचं व्यक्तिमत्व आवडलं आणि 28 सप्टेंबर 1997 रोजी सर्वांचे आवडते अण्णा ऐन उमेदीच्या काळात देवाघरी गेले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!💐
शब्दांकन – श्री. बिभीषण हरिदास सिरसट