सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची १२ जुलै रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा सोमवार (२६ जुलै ) रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे दुपारी दोन वाजता अॉफलाईन आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील 15 हजार 511 पदांची भरती लवकरच https://t.co/FkjNVKMI3l
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
१२ जुलै रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यकडून ही सभा ऑनलाइन न घेता ऑफलाइन घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी ही सर्वसाधारण सभा १९ जुलै रोजी घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र कोरोना नियमाचे पालन करून सर्वसाधारण सभा घेण्यासाठी शहरातील सभागृह उपलब्ध न झाल्याने ही सर्वसाधारण सभा आता सोमवार, २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले येथे होणार आहे.
सोलापूर : गेल्या कित्येक दिवसांपासून लस उपलब्ध नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन कुठल्याही प्रकारे लसींसाठी पाठपुरावा करीत नाही. #solapur #surajyadigital
– निहाल किरनळ्ळी, #सोलापूर
युवाध्यक्ष, आम आदमी पार्टी सोलापूर. #सुराज्यडिजिटल #solapur_needs_vaccine pic.twitter.com/zsle76ETvl— Surajya Digital (@SurajyaDigital) July 14, 2021
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहेत, मात्र अनेक सदस्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे सदस्यांनी ऑफलाइन सभेची मागणी लावून धरली. निधीसाठी आवाज उठविण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत ऑफलाइन सभेला नकार दिला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी जि.प.च्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारागृहात शिपायानेच कैद्यांना गांजा पुरवला, 8 पुड्या जप्त https://t.co/JE0GbKFIO1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
या ठिय्या आंदोलनानंतर आता रंगभवन सभागृहात २६ जुलैला ऑफलाइन सभा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यावेळी ५० टक्के की सर्वच सदस्य उपस्थित राहणार, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार असून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कशी घ्यायची, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा काहीच रोल नसतो. परंतु, आंदोलनावेळी आमच्या काही सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे ऑफलाइन सभा होत नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या मागणीनुसार आता २६ जुलैला ऑफलाइन सभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
जीवघेण्या स्पर्धेत झोपेच्या गोळ्यांचा व्यापार नऊ अब्ज डॉलरवर, आपल्या झोपेचे खोबरे होऊ देवू नका (ब्लॉग) https://t.co/M9e8hbmjQT
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021