मुंबई : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे त्यांनी जाहीर केले. तसेच केंद्र सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केलीय. तसेच आजही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश दिले.
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे त्यांनी जाहीर केले.
आजही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरू ठेवावे, मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
काल शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील, असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढण्याची भीती आहे. तसा काही धोका वाटल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरड कोसळून मोठी दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती https://t.co/9To7DNUnS9
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : दरड कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती #भीती #mumbai #surajyadigital #सुराज्यडिजिटल #मुंबई #11death #दुर्घटना pic.twitter.com/ApTFkaCeDr
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
* 18 ते 22 अॅलर्ट जिल्ह्यांना जारी
भारतीय हवामान विभागानं 18 जुलै साठी कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट दिला आहे. 19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/FYgThsXJgd
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2021
18 जुलैला पालघर, ठाणे, पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला गेला आहे. तर, 19 जुलै रोजी पुणे, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अॅलर्ट दिला गेला आहे. 20 जुलै ,21 जुलै आणि 22 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लाऊ शकतो. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
#UPDATE | A total of seven people died and 1 injured in the incident. The injured has been discharged from the hospital: BMC pic.twitter.com/CDd0KlVP8G
— ANI (@ANI) July 18, 2021
18 जुलैसाठी नंदूरबार, अमरावती,नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलाडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे. तर 19 जुलैसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. 20 जुलै रोजी अमरावती आणि नागपूर तर 21 जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली आणि 22 जुलै रोजी भंडारा आणि गोंदियाला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. यलो अॅलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.