नवी दिल्ली : शेवटच्या षटकात 35 धावांची गरज असताना एका आयरिश फलंदाजाने सलग 6 षटकार ठोकले आहेत. जॉन ग्लास असं फलंदाजाचं नाव आहे. व्हॅली स्टील्स टी-20 स्पर्धेचं फायनल नॉर्थन आयरिश क्लब आणि क्रेगाघो या संघात झाले.. क्रेगाघोने 20 षटकात 147 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश क्लबचे 19 षटकात 113 रन झाले होते. मात्र, 20 व्या षटकात जॉन ग्लासने सलग 6 षटकार ठोकून संघाला विजयी केले. जॉनने 87 धावा केल्या. यावेळी भारतीय संघाचा युवराज सिंगच्या 19 सप्टेंबर 2007 च्या खेळाची आठवण झाली. त्याने सहा बॉलमध्ये सहा सिक्स ठोकल्या होत्या.
One of the greatest cricketers in women's cricket, wishing @mandhana_smriti a very happy birthday🎂#Cricket #SmritiMandhana #HappyBirthday #IndiaWomen #CricTracker pic.twitter.com/w8gDUIKWdV
— CricTracker (@Cricketracker) July 17, 2021
नॉर्दर्न आयर्लंडमधील एलव्हीएस टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रेगाघ संघाचा विजय जवळपास निश्चितच मानला जात होता. याचे कारण म्हणजे, बेलीमेना या संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात तब्बल 35 धावांची आवश्यकता होती. परंतु, बेलीमेना संघाचा कर्णधार जॉन ग्लासने अखेरच्या षटकात सहा षटकार लगावले आणि आपल्या संघाला केवळ हा सामना नाही, तर ही स्पर्धाही जिंकवून दिली. असा विक्रम भारतीय संघातील खेळाडू युवराज सिंग यांच्या नावावर होता.
Wishing a very happy birthday to Youraj Singh the cricketer in India who made a record half-century in T20. International in just 12 balls…#Legend #HappyBirthdayYuvi pic.twitter.com/TbTBGQuMI0
— Vostro Shoes (@BrandVostro) December 12, 2018
आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या क्रेगाघ संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांना 40 पैकी 39 षटकांत बेलीमेना संघावर दबाव टाकण्यात यश आले होते. क्रेगाघने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना बेलीमेना संघाची 19 षटकांत 7 बाद 113 अशी अवस्था होती आणि त्यांना विजयासाठी अखेरच्या षटकात 35 धावांची आवश्यकता होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
JOHN GLASS TAKE A BOW!
He has just hit 36 off the final over and Ballymena are the 2021 Lagan Valley Steels 2021 champions.
What an innings from the skipper. #ncut20t pic.twitter.com/afatC6Q7co
— Northern Cricket Union (@NCU_News) July 15, 2021
बेलीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने अंतिम षटकात प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला. बॅलीमेना संघाचा कर्णधार जॉन ग्लास हा 51 धावांवर खेळत होता अन् संघाला अखेरच्या षटकात 35 धावांची गरज असताना स्ट्राईकवर होता. त्यानं सहा सलग खणखणीत षटकार खेचले अन् नाबाद 87 धावांसह संघाला विजय मिळवून दिला.
बेलीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने अंतिम षटकात तुफानी फटकेबाजी करताना प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला. अंतिम षटकापूर्वी तो 51 धावांवर नाबाद होता. अखेर त्याने नाबाद 87 धावांची खेळी करत बेलीमेनाला हा सामना जिंकवून दिला. त्याआधी गोलंदाजीत जॉनचा भाऊ सॅम ग्लासने हॅटट्रिकची नोंद केली होती. त्याने सामन्यात केवळ पाच धावांत तीन विकेट घेतल्या. ग्लास बंधूंच्या दमदार कामगिरीमुळे बेलीमेना संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
WICKET: Michael Glass (18) had played a couple of brilliant shots through the covers but he’s now bowled by Charlie Shannon.
Ballymena 37-3 into the 10th over. #ncut20t
— Northern Cricket Union (@NCU_News) July 15, 2021
या लढतीत ग्लास बंधू चांगलेच चमकले. जॉन ग्लासने 6 षटकार खेचण्यापूर्वी त्याचा मोठा भाऊ सॅम ग्लास याने क्रेगाघो संघाच्या तीन खेळाडूंना सलगच्या चेंडूवर बाद करत हॅटट्रीक नोंदवली. त्याने 5 धावा देत 3 बळी मिळवले.