विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार के. एस. नाईकवाडी यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ – मंद्रूप हायवेवर कोरवली जिल्हा परिषद शाळेजवळ अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक असल्याचे समजले. यावर तात्काळ कामती पोलीस स्टेशन यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल कोटमळे, पो. हे काॅ. मुंडे, पो. हे. काॅ. कासले, पोलीस नाईक नायकोडे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चुकीची पावती दाखविले. त्यामुळे तपासणी केली असता पाठीमागे रंगीबेरंगी गोणीमध्ये तांदूळ भरून सुतळीने बांधलेले दिसून आले. त्यावरून सदर माल अवैधपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. हा ट्रक पोलिस ठाण्यात आणून तहसीलदारांना पत्र देण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नायब तहसीलदार यांनी या ट्रकची तपासणी करून त्यातील वेगवेगळ्या गोण्यातून तांदूळ तपासणी करता ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये एकूण १९.९०० किलो तांदूळ आढळून आले. तो सर्व तांदूळ जप्त करण्यात आला.
वाहतूक करणारा सागर तानाजी लवटे (रा.तिर्हे), त्यांचे साथीदार रवी म्हमाणे,(रा. शिंगोली ) व सचिन सावकार (रा. विजापूर ) यांचे विरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली. ही कारवाई कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.