मुंबई : अश्लील व्हिडिओ प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्टने काही धक्कादायक माहिती सांगितली आहे. अटकेच्या काही दिवस आधी मी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये गेले होते. ते ‘बॉलीफेम’ नावाचं ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सर्वकाही तयार होतं. ॲपसाठी रियॅलिटी शो, चॅट शो, म्युझिक व्हिडिओ, कॉमेडी शो आणि नॉर्मल फिल्म बनवण्याची तयारी सुरू होती. शमिता शेट्टी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होती, असं तिने म्हटलं.
दरम्यान पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना दिलासा मिळाला नाही. त्याची 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज कंपनीत शिल्पासुद्धा महत्त्वाच्या पदावर होती. त्यामुळे तिचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
पतीच्या अटकेपासून ते आतापर्यंत शिल्पा काहीच कमेंट केली नाही.पण पहिल्यांदाच काल इन्स्टाग्रामवरुन व्यक्त झाल्याचं पहायला मिळत आहे. कुंद्रा यांच्या अटकेनंतर शिल्पाने प्रत्यक्षात समोर येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. तरीही शिल्पाचा या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का?, शिल्पाला याची कल्पना होती का? या आणि अशा बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत.
अटकेच्या सोमवारपासून शिल्पाने कामाबरोबरच सोशल मीडियावरुनही ब्रेक घेतला होता. मात्र काल गुरुवारी रात्री तिने एक इन्टाग्राम स्टोरी पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये जेम्स थर्बर या लेखाचं एक वाक्य दिसून येत आहे. “रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरुक राहून याकडे पाहा,” असा या वाक्याचा अर्थ आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामिनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आणि म्हणाली राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण म्हणजेच मेहुणी शमिता शेट्टीसोबत काम करणार होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा चित्रपट राज कुंद्रा एका अॅपवर प्रदर्शित करणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होती, असे देखील तिने सांगितले. एवढंच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त कंगना रणौत, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राचं देखील नाव घेतलं आहे.
गहनाने ‘नवभार टाईम्स ऑनलाईन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. “तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिला गेली होती. त्यावेळी कळले की बॉलीफेम नावाचं एक नवीन ॲप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या ॲपवर आम्ही रिॲलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती.
त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एक-एक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला. मला अटक होण्याच्या 3 ते 4 दिवस आधी मी त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत होते. मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते,” असे गहना म्हणाली.
शमिता शेट्टी आणि त्यांची कधी भेट झाली का याविषयी बोलताना गहना पुढे म्हणाली, “मी शमिताला कधी भेटले नाही. चित्रपटाची स्क्रिप्ट ही मी उमेश कामत यांना शमिताला देण्यासाठी सांगितले होते. ती किती पैसे घेणार आहे आणि तिच्या काय अटी असणार आहेत याच्याशी मला काही घेणदेण नव्हतं आणि मी या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीत पडले नाही. शमिताने उमेश कामतशी यावर चर्चा केली होती आणि यासाठी तिने होकार दिला होता, असे तिने सांगितले.