टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला धक्का बसला आहे. महिला दुहेरीत सानिया आणि अंकिता रैना या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. युक्रेनच्या जुळ्या बहिणी ल्यूडमिला किचेनोक आणि नादिया यांनी भारतीय जोडीवर विजय मिळवला आहे. 6-0, 6-7(0-7), (8-10) अशा फरकाने हा सामना भारताच्या हातून निसटला. सानिया मिर्झाची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
भारताला मीराबाई चानूमुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदकावर माेहर उमटवता आली. तिच्या यशामुळे अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी शनिवारी भारताची सुरुवात दिमाखदार झाली होती. ४९ किला वजनी गटात तिने रौप्यपदक पटकावले. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिप्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. तिने यशानंतर पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली. ही माहिती पिझ्झा कंपनीला कळाली. यावर पिझ्झा कंपनीने मीराबाई चानूला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये सानिया मिर्झा – अंकिता रैना जोडीचे प्रदर्शन असमाधानकारक झाले. पहिल्याच सामन्यात सानिया मिर्झा – अंकिता रैनाने यांचा पराभव झाला. यामुळे दुर्देवाने महिला दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सानिया -अंकिताने पहिला सेट 0-6 असा जिंकला. पहिल्या सेट जिंकल्यानंतर सानिया-अंकिता यांच्या जोडीने दुसर्या सेटमध्ये 5-3 अशी आघाडीही घेतली. यूक्रेनची लिडमय आणि नादिया किचनोक यांनी झुंजार खेळी करत सलग दोन सेट जिंकत 6-0, 6-7(0-7), (8-10) असा सामना आपल्या बाजूने फिरवला. पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने सानिया मिर्झा-अंकिता रैना जोडीचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपले आहे.
टोकियो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देण्यासाठी एक प्रबळ दावेदार असणारी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही अंकिता रैनासोबत मिळून महिला डबल्सच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. भारताच्या या जोडीला टेनिस खेळाच्या महिला डबल्समध्ये युक्रेनच्या नादीया आणि ल्युएडमायला भगिनीच्या जोडीने दारुण पराभूत केले.
सानिया आणि अंकिता यांनी सामन्याची सुरुवात जोरदार केली. दोघींनी पहिला सेट 6-0 च्या फरकाने जिंकला. पण त्यानंतर पुढील दोन सेट गमावले. पहिला सेट जिंकणारी ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-7(0) 8-10 च्या फरकाने पराभूत झाली. ज्यामुळे महिला डबल्समधील पहिल्या फेरीतील सामना 6-0, 6-7(0), 8-10 च्या फरकाने भारताच्या हातातून गेला आहे.