नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वाचे बजेट कोसळले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. मोठ्या शहरात पेट्रोलची किंमत 110 रूपयांवर गेली आहे. पण आता पेट्रोल आणि डिझेलचे टेन्शन संपणार आहे. कारण आता कोंबड्यापासून बायोडिझेल तयार होणार आहे. हो खरंय चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार होणार आहे. यासाठी 18 लाख रूपयांचा खर्च आलाय.
केरळ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक जाॅन अब्राहम यांनी सांगितले की, त्यांना साडेसात वर्षांच्या प्रतीक्षानंतर 7 जुलै 2021 रोजी भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट देण्यात आले.कत्तल झालेल्या कोंबड्यांच्या कच-यातून काढलेल्या तेलामधून बायो डीझेलचा शोध अब्राहमने शोधला.
त्यांनी सांगितले की त्यांनी याचा शोध 2009 -12 दरम्यानच लावला. दिवंगत प्रोफेसर रमेश श्रावणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. संशोधनानंतर अब्राहमने 2014 मध्ये वायनाडमधील कलपेट्टाजवळील पोकोडे वेटेरिनरी कॉलेजमध्ये 18 लाख रुपये खर्च करून एक प्रयोगात्मक संयंत्र स्थापित केले.
केरळच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एक महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम शिकवतात. प्राध्यापक म्हणून काम करत असताना ते विविध विषयावर संशोधन देखील करत आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते.
अखेर त्यांच्या या प्रयोगाला यश मिळालं आहे. त्यांना या शोधासाठीचं पेटंटही देण्यात आलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत या बायोडिझेलची किंमत कमी आहे. या बायोइंधनाद्वारे एक लीटरमध्ये गाडी 38 किलोमीटर प्रवास करते. तर प्रदूषण रोखण्यासाठी देखील हे बायोइंधन मदत करू शकतं. वायनाड येथील महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम यांनी या बायोडिझेलचा शोध लावला. त्यासाठी त्यांनी तब्बल 18 लाख रूपयांचा खर्च आला आहे.
दरम्यान, कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत विशिष्ट घटक असल्यानं त्यापासून सामान्य तापमानाला तेल काढणं सोपं असतं. त्यामुळे बायोडिझेल प्रक्रिया सोपी होते. 100 किलो चिकन वेस्टपासून 1 लीटर बायोडिझेल तयार केलं जाऊ शकतं. तर या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.
* वाहनातून निघणारा धूर 47 टक्क्यांनी कमी होणार
इंधनासाठी ते फक्त कोंबड्यांचा कचरा का वापरता असे विचारले असता, अब्राहम म्हणाले की पक्षी आणि डुकरांच्या पोटात चरबी भरपूर प्रमाणात होते आणि यामुळे सामान्य तापमानात त्यांच्याकडून तेल काढणे सोपे आहे. अब्राहम आणि त्याचे विद्यार्थी आता डुक्कर कचर्यापासून बायोडीझेल बनवण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत. ते म्हणाले की, कसाई घरांमधून 100 किलो पोल्ट्री कचऱ्यापासून एक लिटर बायो-डिझेल तयार केले जाऊ शकते.
डॉ. अब्राहम यांनी सांगितले की कोंबडीच्या कचर्यामध्ये अंदाजे 62% चरबी असते, ज्यामधून एनर्जी कंटेंट चा मुख्य अवयव सिटेन 72 व्या लेवलला आढळतो, तर सामान्य डिझेलमध्ये तो केवळ 64 च्या पातळीवर असतो. पोल्ट्री कचऱ्या पासून बनविलेले बायोडीझल वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता 11% वाढते. यासह वाहनातून निघणारा धूर 47 टक्क्यांनी कमी होतो.