सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पालिका मुख्य सभागृहात सुरु झाली आहे. ही सभा ऑनलाईन पध्दतीनं आहे. एकूण सदस्य संख्येच्या २५ टक्के इतक्याच सदस्यांना सभागृहात प्रवेश आहे.
सत्ताधारी भाजपाचे गटनेते शिवानंद पाटील यांनी प्रशासनाकडून आलेला अर्थसंकल्प सादर केला. नगरसेवकांना प्रत्येक ३० लाख रुपये विकास कामासाठी द्यावेत यासाठी ३८ कोटींची तरतूद बजेटमध्ये आहे. याशिवाय परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तरतूद ठेवण्यात आली आहे. शहरातील स्मार्ट सिटी योजनेसंबंधात झालेला खर्चाचा तपशील सभागृहापुढे ठेवावा तसेच मिनी आणि मेजर शॉपिंग सेंटर यांच्या भाडेवाडीबाबत त्वरीत निर्णय घ्यावा असे अर्थसंकल्पात म्हंटले आहे. याचबरोबर बजेटमध्ये सत्ताधाऱ्यांनी दवाखान्यांसाठी विशेष तरतूद केले आहे. मनपातील भुखंड मोजणीसाठी जवळपास ३ कोटीची तरतूद आहे. शहरात गॅस आणि केबलसाठी करण्यात आलेल्या खोदाईचे खड्डे बुजविण्यासाठी २ कोटीची तरतूद आहे.
हद्दवाढ भागातील डि.पी. रस्ते विकसीत करणे, आपतकालीन कामासाठी महापौरांसाठी १० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनी स्वच्छता उपकर लागू करावा असे म्हटले होते. तो विषय सत्ताधाऱ्यांनी नामंजूर करण्याचं प्रस्तावीत केलं आहे. कोणतेही करवाढ आणि दरवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पालिकेच्या बजेट सभेत सर्वच सदस्यांना प्रवेश मिळायला हवा. बजेट हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, असं मत सभेपूर्वी सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी व्यक्त केलं. मात्र शासनाच्या नियमामुळे असं करता येणार नाही, असं पालिका आयुक्तांनी ठासून सांगितलं. पोलीस बंदोबस्तात पालिकेची सभा सुरु आहे.
* महापौर, सभागृह नेता यांच्यावर गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी
सोलापूर : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर महापालिकेने या आदेशाचे उल्लंघन करून ऑफलाईन सभेचे आयोजन करून राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे महापौर व सभागृह नेता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे.
– आणखी बातमी अपडेट होत आहे….रिफ्रेश करत चला