नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्ये संघर्ष चिघळला आहे. सीमावादावरून दोन्ही राज्यातील पोलिसात झालेल्या हिंसाचारात 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. आसामचे 200 पोलिस बळजबरीने सीमेवर आले होते, असा आरोप मिझोरामचे गृहमंत्री लालचमलियाना यांनी केला आहे. तर आपल्या सीमांचे रक्षण करतांना आसामचे 6 पोलीस शहीद झाल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी म्हटले आहे.
आसाम आणि मिझोराम सीमेवरून तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा तणाव थांबत नसून अधिकच वाढत आहे. आतापर्यंत या तणावात 6 पोलीस शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारीदेखील जखमी झाले आहेत. या आसाम आणि मिझोराम दोन राज्याच्या
आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप केले मात्र नंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचं सागंण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकही झाली होती. मात्र त्याचा प्रभाव काही झाला नाही. आणखी तणाव वाढतच आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्ये सीमावादावरून संघर्ष चिघळला आहे. या हिंसाचारात 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहे. या जखमी झालेल्या पोलिसांमध्ये पुण्याच्या इंदापूर येथील एका सुपुत्राचा समावेश आहे. वैभव चंद्रकांत निंबाळकर असं त्याचं नाव आहे. ते आसामच्या कछार जिल्ह्याचे एसपी म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसाम-मिझोराम सीमेवर असलेल्या काचारचे जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर (महाराष्ट्रीयन) यांच्या पायात गोळी लागली आहे. या भागामध्ये आसाम आणि मिझोराममध्ये सीमावाद आहे. त्यातूनच मिझोराममधून आसाम पोलिसांवर मोठा हल्ला झाला आहे. पोलिसांवर गोळीबार आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यात किमान 6 पोलीस शहीद झालेत. तर जवळपास 50 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिझोरममधील गटाकडून झालेल्या गोळीबारमध्ये
महाराष्ट्राचा पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. सीमावादावर शांततामय मार्गानं तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.