सोलापूर : भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची, भाजपला मी चॅलेंज करते, काम पूर्ण करुन दाखवा, असे आव्हान आमदार प्रणिती शिंदे यांनी स्थानिक भाजपनेत्यांना आणि पदाधिका-यांना दिला आहे.
काँग्रेसने आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद निश्चितपणे दाखवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना दिला.
काँग्रेस मनामनात, काँग्रेस घराघरात’ या मोहिमेचा शुभारंभ उत्तर कसबा परिसरात झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. या प्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रवीण वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी वाले, नरोटे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपविरूध्द टीकेची झोड उठविली. प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची. किती वर्षे आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्र सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते, तर एवढी लोकं मेली नसती. त्यांच्या मृत्यूला केवळ पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहेत, असा हल्लाही शिंदे यांनी चढविला.
* कंत्राटदारांची पोटं मोठी केल्याचा आरोप
भाजप सत्ताधाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांच्या घराघरांत पाणी आणण्याऐवजी महागाई आणली. जातीच्या नावाखाली त्यांनी आजवर राजकारण केले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. वायफायने लोकांची पोटं भरणार नाहीत. शहराच्या एकूण परिसरातील तीन टक्के भागात स्मार्ट सिटी होत आहे. हातावरील पोट असलेल्या लोकांसाठी काहीच केले जात नाही. केवळ टक्केवारीतून स्वत:ची आणि कंत्राटदारांची पोटं मोठी केली, अशीही टिका आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमात केली.
* पालकमंत्री भरणेंच्या कारचा अपघात
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारचा नेरुळच्या एलपी पुलावर अपघात झाला. पोलीस सुरक्षेत ते मुंबईच्या दिशेने जात असताना, एक खासगी कार त्यांच्या ताफ्यात घुसली. या एस्कॉर्टमधील कारची कारला धडक लागल्याने पाठीमागून येणारी भरणे यांची कार एस्कॉर्टला धडकली. या राज्यमंत्री भरणे हे थोडक्यात बचावले असून, तीन कारचे नुकसान झाले आहे.
राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरुवारी मुंबईला जात असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत एस्कॉर्टमधील पोलिसांसह मंत्री भरणे यांच्यावरील संकट थोडक्यात टळले. मात्र खासगी कारसह एस्कॉर्ट कार व भरणे यांच्या कारचे नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी खासगी कार चालक हरेश सरमळकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.