सोलापूर : सोलापूर, महाराष्ट्रच नव्हे देशात विक्रम करणारे सर्वात जास्तवेळा निवडून येणारे दुसरे आमदार गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांचे काल (शुक्रवारी) रात्री सोलापुरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर या दुःखद घटनेने शोककळा पसरली आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. आज शनिवारी सकाळी अश्विनीमधून पार्थिव निघणार, पुढे मोहोळ तालुक्यातील पेनूर या त्यांच्या जन्मगावी येथे काही वेळ थांबून पुढे नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांची कर्मभूमी असलेल्या सांगोल्याला आणण्यात येणार आहे. हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दोन तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघून सांगोला सूत मिलमधील मैदानात त्यांच्यावर दुपारी दीड, दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दुष्काळाच्या प्रश्नावर आबा तासन्तास बोलायचे
———————————————–
राजकारणातील भीष्मपितामह, तब्बल ११ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करत जनसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा पोटतिडकीने व तेवढेच आक्रमकपणे मांडत प्रशासनाला धारेवर धरणारे आबा आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या अनेक आठवणी सांगता येतील. पत्रकारिता करीत असताना डीपीसी मिटिंगमध्ये बसण्याचा अनेकवेळा योग आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या मिटींगला आबा अगदी वेळेत येऊन आपल्या हातातील अहवाल वाचत बसायचे. आबा मिटींगला आहेत म्हटल्यावर पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा. कारण आबा प्रत्येक विषयात अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत त्यांना सोडत नसे. तुमची बांधिलकी जनतेशी आहे, जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला खुर्चीवर बसवले आहेत, त्यामुळे काहीतरी ओबडधोबड उत्तरे देऊन मीटिंग संपवण्याची घाई करू नका, अशा शब्दांत जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सकाळी अकराला सुरू झालेली मीटिंग कधीकधी सायंकाळी सहा वाजेपर्यंतही सुरूच राहायची. जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही अथवा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत आबा शांत बसत नसे. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वादात डीपीसी मिटिंग एकदा वेळेत झाली नव्हती. म्हणजे दोन तीन महिन्यानंतर उशिराने झाली. त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी मुंढे प्रास्ताविक करीत असताना त्यांना थांबवीत तुमच्यातील मतभेदांमुळे निधी वेळेवर खर्च होत नसल्याचे सांगत चांगलेच खडसावले. सभागृहात बोलताना आबा कोणाचेही भाडभीड ठेवत नसे. एकदा टंचाई मीटिंगमध्ये मांडलेले मुद्दे अधिकाऱ्यांनी प्रोसिडिंगमध्येच घेतले नव्हते. तेव्हा बाबांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. दुष्काळाच्या प्रश्नावर बाबा तासन्तास बोलायचे. नियमावर बोट ठेवून दुष्काळाशी सामना करता येत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, मुक्या जनावरांना चारा द्या, नियम बाजूला ठेवून पाण्यासाठी टॅंकर द्या, असे ते पोटतिडकीने बोलायचे.
आबांच्या बोलण्यातून त्यांची बांधीलकी मक्तेदारी नसून जनतेशी आहे, याची आठवण क्षणोक्षणी होत असे. आता त्यांच्या आठवणी या आठवणीच राहणार आहेत. आबासाहेबांना अखेरचा लाल सलाम!
– विठ्ठल खेडगी, पत्रकार
* ….यावेळी अधिवेशनात मान खाली घालून दोन्ही हाथ डोक्याला लावून बसले होते आबा
एक अविस्मरणीय क्षण आणि प्रसंग.
नागपूर हिवाळी अधिवेशनातील दुपारच्या सत्रात खुप मोठा प्रचंड गोंधळ झाला 288 आमदारांपैकी 287 आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली फाईल फेकून दिल्या सभागृहाची दयनीय अवस्था वाईट करून टाकली 287 आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले फक्त त्या सभागृहात फक्त एकच आमदार होते ते म्हणजे आदरणीय आबासाहेब मान खाली घालून दोन्ही हाथ डोक्याला लावून बसलेले ?
दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये डोक्याला दोन्ही हाथ लावलेला आबासाहेबांचा फोटो छापून आला ती न्यूज व फोटो पाहून लोकांना शॉक बसला ?
287 आमदारांनी गोंधळ का केला असेल ?
महाराष्ट्रातील जनतेला वाटलं गरीबाच्या पुनर्वसनाचा अथवा या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहितासाठी गोंधळ झाला असेल ?
पण जेव्हा लोकांना कळलं की कालचा गोंधळ हा 287 आमदारांनी त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करावी म्हणून सभागृहात गोंधळ घातला फायली भिरकावून दिल्या.
त्या सभागृहात डोक्याला हाथ लावून बसलेले आदरणीय आबासाहेब यांना पेन्शन वाढ नको होती ?
पत्रकारांनी आबाना विचारले तुम्हाला का पेन्शन वाढ नको आहे त्यावर त्यांनी तात्काळ आबासाहेबांनी सांगितले की
महाराष्ट्रातील गरीब जनता ही आर्थिकदृष्टीने सक्षम नाही
गरीब हे गरीबच रहात चालले आहे त्यांना घरे नाहीत रहायला
आपल्याला लोकांनी विकासासाठी निवडून दिले आहे
आपल्या पेन्शन वाढीसाठी नाही ?
इतका गोंधळ होऊन देखील तिसऱ्या दिवशी पेन्शनवाढ मंजूर झाली……..😢
प्रिय गणपतराव देशमुख(आबासाहेब)
50 वर्षे यशस्वी कल्याणकारी आमदार यांना
आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली
शब्दरचना – शब्दांकन
राजेश जगताप
MH13
सोलापूर.