सोलापूर : सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले (वय 56 ) यांचे बुधवारी निधन झाले. ते जिम मध्ये व्यायामसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, चांगल्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.सुहास भोसले हे झोन क्रमांक एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, जेलरोड पोलीस ठाण्यात हे कार्यालय होते. 1 एप्रिल 2021 रोजी ते अमरावती हून सोलापुरात रुजू झाले होते. त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.
काल मंगळवारी आंतरजिल्हा टोळीला अटक करुन चोरीच्या १० मोटारसायकली जप्तीची कारवाई केली होती. त्यांच्या मार्गदार्शनाखाली जोडभावी पेठ पोलिसांनी कामगिरी केली होती. यावेळी त्यांनी पथकासोबत माहिती देऊन फोटोसाठीही थांबले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चहाही घेतला. हा चहा शेवटचाच ठरल्याचे क्राईम बीट पाहणा-या पत्रकारांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर शहर परिसरातून ६ तर लातूर जिल्हा परिसरातून ४ अशा एकूण १० मोटरसायकली चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना जोडभावीपेठच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आले.
सुहास भोसले यांचे अकाली निधन झाल्याची बातमी कळताच वरिष्ठ अधिकारी ते अगदी विविध खात्यातील पोलीस कर्मचारी यांनी आश्विनी रुग्णालयाकडे धाव घेतली. वरिष्ठांनी भोसले यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. आज दुपारपर्यंत नातेवाईक पुण्याहून सोलापूरात दाखल होतील. नातेवाईकांशी चर्चेनंतर भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. नुकत्याच झालेल्या लॉकडाऊन काळात तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी चोख बंदोबस्तासाठी भोसले सेवेत होते.
* पतीच्या मित्रानेच केला बलात्कार
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच पतीच्या संमतीनेच सोलापूर येथे त्याच्या मित्राने विवाहितेवर घरात घुसून बलात्कार केला. याप्रकरणी पती व त्याचा मित्र अक्षय राजकुमार गवसाने (रा. सात रस्ता) या दोघाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे, विवाहितेच्या पतीचा अक्षय गवसाने हा मित्र आहे. त्याने ओळखीतून त्या विवाहितेला हॉस्पिटलमध्ये चांगली नोकरी लावतो असे आमिष दाखविले. त्यातून मार्च 2021 पासून ओळख वाढविली. त्याने विवाहितेचा मोबाईल क्रमांकही घेतला. तेव्हापासून तो त्या विवाहितेला व्हॉटस्अॅपवर चाटिंग करू लागला. तिने त्याला प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, पतीच्या सांगण्यावरून 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पतीसमवेत अक्षय हा विवाहितेच्या घरी आला. तेव्हा तिने पतीला याबाबत विचारले. त्यावेळी पतीने अक्षय व तो त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपतो असे सांगितले. त्यानुसार ते दोघे टेरेसवर झोपण्यास गेले. त्यानंतर काही कालावधीनंतर अक्षय हा घराचा दरवाजा ढकलून पुन्हा आत आला.
विवाहितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडा-ओरड करू नये म्हणून अक्षयने हाताने तिचे तोंड दाबून तिला ओढत बेडरूममध्ये नेले. तेथे ‘तुझ्या पतीनेच मला तुझ्याजवळ झोपण्यास सांगितले असे तो म्हणाला.
‘तुझा पती नामर्द आहे, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे असे सांगत त्याने तिला पतीसोबतचे अश्लिल फोटो दाखविले. आरडाओरड केली तर तुझ्या पतीची व तुझी बदनामी करेन अशी धमकी विवाहितेला दिली. तिने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.