हैदराबाद : तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी उद्योगपती आणि भाजप नेते व्ही. श्रीनिवास प्रसाद यांना कारमध्ये जिवंत जाळले. यात त्यांचा मृत्यू झाला. काल मंगळवारी प्रसाद यांचा मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला. श्रीनिवास हे भाजपचे या जिल्ह्यातील माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.
अज्ञात व्यक्तींनी व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा गाडीच्या डिग्गीमध्ये बंद करुन पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेलंगणामधील मेडक जिल्ह्यात काल मंगळवारी ही भयावह घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडक जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्याला जिवंत जाळण्यात आलं आहे. काही अज्ञात लोकांनी नेत्याला गाडीच्या डिग्गीमध्ये बंद केलं आणि आग लावून दिली. यामध्ये भाजप व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेडकच्या पोलिस निरीक्षक चंदना दिप्ती म्हणाल्या, ‘काही अज्ञात लोकांना भाजप नेत्याला त्यांच्याच कारच्या डिग्गीमध्ये बंद करुन आग लावली. गाडीच्या डिग्गीमध्ये त्यांचा मृतदेह मिळाला. या प्रकरणाचा तपास वेगानं सुरु आहे.
* प्रकाश राजवर होणार सर्जरी
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांची तब्येत बिघडली आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे प्रकाश राज सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. नुकताच प्रकाश राज यांनी केलेल्या ट्वीटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सर्जरीसाठी हैदाराबादला पोहोचल्याचे म्हटले आहे.
प्रकाश राज हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते बिनधास्तपणे त्यांचे मत सोशल मीडियाद्वारे मांडताना दिसतात. नुकताच प्रकाश राज यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. ‘मी पडलो आहे. एक छोटासा फ्रॅक्चर आहे. सर्जरीसाठी मी माझा मित्र डॉ. गुरुवरेड्डीकडे हैदराबादला जात आहे.