नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी लाल किल्ला परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे. या कंटेनरच्या भिंतीवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. तर कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.
१५ ऑगस्टला लाल किल्ल्याची जबाबदारी एनएसजी, एसपीजी, पॅरामिलिट्री फोर्सचे जवान आणि दिल्ली पोलिसांच्या हाती आहे. जवळपास ४० हजाराहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
या शिपिंग कंटेनच्या भिंतीवर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, शहीद भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. तर कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला लक्षात घेऊन ही बंदोबस्ताची तयारी केली आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलनही सुरु आहे. त्यामुळे आंदोलनाची शक्यता पाहता कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. काही आंदोलनकर्ते लाल किल्ल्यावर पोहोचले होते. तसेच काही जणांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वजाच्या दुस-या ध्वजस्तंभावर एक धार्मिक झेंडा फडकवला होता. तर काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्याजवळ ड्रोन हल्ला झाल्याचे पाहायला मिळालं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ ड्रोन जप्त केलं होतं. १ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या मागील रोडवर एका वेब सीरिजचं शूटींग सुरु होतं. या शूटींगसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता, असंही सांगितले जातंय. एकूण एक सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.