मुंबई : टीईटी घोटाळ्यात पाच जणांनी 234 कोटींहून अधिक पैशांची कमाई केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे नकली प्रमाणपत्र वाटण्यात आले होते. आता या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीत 7900 उमेदवारांकडून 2 ते 3 लाख रूपये वसूल केल्याची माहिती उघड झाली आहे. तर याप्रकरणी परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकरला अटक झाली आहे.
तुकाराम सुपेला परीक्षेचं कंत्राट दिलेल्या जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार याने तब्बल 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही शिवकुमारनं पोलीस तपासात दिली आहे. याशिवाय 2018 सालीचं तुकाराम सुपेनं प्रकरण दाबल्याची पोलीस चौकशीत माहिती दिली आहे. जळगावच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 81 बनावट प्रमाणपत्र देऊनही सुपेनं काही कारवाई केली नाही नसल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा पोलीस कोठडीत तपास चालणार आहे.
234 crore black market in TET scam; 29 arrested in Marathwada
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
टीईटी परीक्षेचं आयोजन करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर कंपनीकडून तुकाराम सुपेनं पैसे घेतल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार यानं तुकाराम सुपे याला 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेल्या तपासात म्हटलं आहे.
टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.
□ मराठवाड्यातील तब्बल 29 जणांना अटक
टीईटी, आरोग्य भरती, म्हाडा आणि पोलीस भरती घोटाळ्यामध्ये मराठवाडा कनेक्शन स्ट्रॉंग असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय. दोन-चार नव्हे तर मराठवाड्यातील तब्बल 31 मास्टर माईंड्स पोलिसांच्या हाती लागलेत. या मास्टरमाईंडसोबत अनेक सरकारी अधिकारी- कर्मचारी, घोटाळ्यात आर्थिक देवाणघेवाण करणारे दलाल आणि यात आपलं उखळ पांढरं करून घेणारे महाभाग आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
राज्यात नोकर भरती संदर्भात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य विभाग भरती, टीईटी म्हाडा पोलीस भरती परीक्षेच्या घोटाळ्यात मराठवाड्यातील तब्बल 29 जणांना अटक करण्यात आलीय. यातले अर्ध्याहून अधिक आरोग्य विभाग भरती, टीईटी म्हाडा आणि पोलीस भरती घोटाळ्यात सहभागी आहेत. या घोटाळेबाजानी बीड, औरंगाबाद हे सेंटर ठेऊन घोटाळ्याची व्याप्ती साऱ्या महाराष्ट्रात पसरवली. यात बीडमधून 12, औरंगाबादमधून 11 आणि जालन्यातून पाच जणांना अटक करण्यात आलीय. काही जण फरार आहेत आणि काही जण तपासणीनंतर अटकेच्या रडारवर आहेत.
My friend first found your blog on Google and she referred your blog to me.`-;,”