नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा पत्रकारावर संतापल्याचे पहायला मिळाले. एका पत्रकाराने लोकांनी 40 रुपये प्रतिलीटर आणि स्वयंपाकाचा गॅस 300 रुपये सुनिश्चित करू शकणाऱ्या सरकारचा विचार केला पाहिजे असे आपण म्हटले होते, याची आठवण करुन दिली. यावर रामदेव बाबा म्हणाले की, ‘हो मी तसं म्हणालो होतो, तुम्ही काय करु शकता? मला असे प्रश्न विचारत जाऊ नका. मी तुमचा कंत्राटदार आहे का जो सतत तुमच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार?’
गेल्या १० दिवसांमध्ये ९ वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यावरुन योगगुरु बाबा रामदेव यांना एका पत्रकाराने प्रश्न केला असता ते अस्वस्थ झाले आणि संतापले होते. मीडियासमोर त्यांची अस्वस्थता दिसून येत होती. बाबा रामदेव पत्रकारावर चिडले आणि धमकावत होते.
हरियाणातील कर्नाल येथे एका कार्यक्रमात एका पत्रकाराने रामदेव बाबांच्या विधानाबाबत प्रश्न केला की, तुम्ही म्हटलं होते लोकांना अशा सरकारसाठी विचार केला पाहिजे जे ४० रुपये प्रति लीटर पेट्रोल आणि ३०० रुपये प्रति लीटर सिलेंडर देऊ शकतील. यावर रामदेब बाबा म्हणाले की, मी असे म्हटलं होतो, तुम्ही काय करु शकता? असा प्रश्न विचारु नका. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा ठेका घेतला नाही. तुम्ही काही प्रश्न विचाराल आणि मी त्याचे उत्तर देईल.
रामदेवबाबाच्या या घूमजाव व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला की, तुम्ही सगळ्या मीडिया चॅनल्सला बाईट दिला आहे. यावर रामदेव बाबांनी पत्रकाराकडे इशारा करत म्हटले की, मी प्रतिक्रिया दिली होती परंतु आता नाही देत, काय करणार तु? आता शांत बस, जर आता विचारले तर बरोबर नाही. एकदा सांगितले ना मग जास्त उद्धटपणा नको, तु सभ्य आई-बाबांचा मुलगा आहेस असे रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.
पुढे रामदेव बाबा म्हणाले की, लोकांनी अधिक मेहनत केली पाहिजे. सरकार म्हणतंय जर तेलावरील दर कमी केले तर कर कसा मिळणार मग देश कसा चालवणार, देशातील सैन्याला पगार कसा देणार, रस्ता कसा बांधणार, महागाई कमी झाली पाहिजे हे मला मान्य आहे. परंतु याला दोन्ही बाजू आहेत. मी संन्यासी असूनही सकाळी ४ वाजता उठतो आणि रात्री १० वाजेपर्यंत काम करतो.
Ramdev Baba got angry, ‘Yes, I made the statement, what are you going to do?’
"चुप हो जा, आगे से पूछेगा तो ठीक नहीं होगा" pic.twitter.com/tdcZjkKHOR
— Ranvijay Singh (@ranvijaylive) March 30, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
देशभरात गेल्या १० दिवसांत सलग नवव्यांदा पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीमध्ये ८०-८० पैशांनी प्रतिलिटर वाढ केली आहे. यानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८१ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याच वेळी, डिझेल ९३ रुपयांच्या पुढे जाऊन ९३.०७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
या दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. बाबा रामदेव याना याबाबत प्रश्न विचारला तर ते पत्रकारावरच भडकले आणि त्याला गप्प बसायला सांगितले. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बाबा रामदेव हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. बाबा रामदेव हे करनाल येथे मित्र महाराज अभेदानंद यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सध्याच्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांबद्दल त्यांचे मत विचारले.
यावर रामदेवबाबानीं उत्तर दिले ‘जास्त श्रम करून उत्पन्न वाढवा.’ सध्याच्या दरांबाबत तुम्हाला काय वाटते, या प्रश्नावर बाबा भडकले आणि ‘गप्प बस, नाही तर चांगले हाेणार नाही’, अशी धमकी दिली! तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील आहे का? असा संताप व्यक्त केला व ‘हाे, मी केले हाेते वक्तव्य, आता तू काय करणार आहेस? गप्प राहा, पुन्हा प्रश्न केला तर तुझ्यासाठी हे चांगले होणार नाही! अशी धमकी दिली.