पंढरपूर / सोलापूर : चैत्रीशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. पंढरीत आज दोन लाख भाविक वारकरी दाखल झाल्याने पंढरपूर गजबजून गेले आहे.
चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणी गाभाऱ्यात द्राक्षांची नयनरम्य आरास केलीय. मंदिर समितीच्या वतीने एकादशी निमित्त पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांसाठी खिचडी, चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. नित्यपूजेस मंदिर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य माधवी निगडे, शकुंतला नडगिरे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
चैत्रीशुध्द वारीसाठी सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, अवघी पंढरी नगरी विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमून गेली आहे. मराठी वर्षांतील पहिली यात्रा आणि वारकरी संप्रदायातील चार महत्त्वाच्या वारींपैकी एक चैत्र वारी. या वारीसाठी शेजारील कर्नाटक राज्यातूनही भाविक दरवर्षी येतात.
आज मंगळवारच्या चैत्री एकादशी वारीचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या गाभाऱ्यात मनमोहक अशी द्राक्षांची आरास केली आहे. चैत्री वारी पोहचती करण्यासाठी पंढरी नगरी दोन लाखांहून अधिक वारकरी भाविक दाखल झाले आहेत. यात्रेसाठी भाविकांच्या सुरक्षितता, आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Two lakh Warakaris filed in Pandharpur for Chaitrishuddha Wari
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चंद्रभागा नदीचे वाळवंट, मंदिर, नगरप्रदक्षिणा मार्ग, मठ, धर्मशाळा हा परिसर टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या नाम घोषाने दुमदुमून गेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त, निर्बंधमुक्त वारी भरत असल्याने भाविकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नसल्याचं चित्र आहे. श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास व मंदिरात चैत्र यात्रा कामदा एकादशी निमित्त द्राक्षांची आकर्षक व नयनरम्य अशी आरास करण्यात आली आहे.
मराठी वर्षांतील पहिली यात्रा आणि वारकरी संप्रदायातील चार महत्त्वाच्या वारींपैकी एक चैत्र वारी.
पंढरपुरात भरणा-या चार महत्वाच्या यात्रांपैकी चैत्री यात्रा आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हरि व हर अर्थात विष्णू व महादेव यांच्यामध्ये भेदाभेद नसल्याचा संदेश देणारी ही वारी आहे. येथे पांडुरंगाने आपल्या मस्तकावर महादेवाला स्थान दिले आहे. यामुळेच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेसाठी येणारे भाविक विठुरायाचेदेखील दर्शन घेतात.
□ उद्या द्वादशी मोफत खिचडी, सरबत ताक वाटप
यंदा भाविकांसाठी दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात १०० सीसीटीव्ही कॅमेरे,दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. दर्शनरांगेत भाविकांना एकादशी म्हणजे १२ एप्रिल व द्वादशी म्हणजे १३ रोजी भाविकांना मोफत खिचडी, सरबत, ताक वाटप करण्यात येणार आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला असल्याचे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी सांगितले.
■■■■■♤■♤♤♤♤♤■■■■■
भाविकांच्या पिकअपचा अपघात, 12 जखमी
तळेगाव दाभाडे (ता. मावळ जिल्हा पुणे) येथून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांचे पिक-अप वाहन वेळापूर – पंढरपूर रोडवर पिराची कुरोलीजवळ आले असता अपघात झाला.
हा अपघात आज पहाटे झाला. झोपेमध्ये वाहनांचे नियंत्रण सुटून 33KV HT लाईनच्या खांबावर आपटले. त्यामध्ये 12 वारकरी जखमी असून 4 वारकरी गंभीर जखमी (परंतु धोक्याचे बाहेर) आहेत.
सर्व जखमी वारकऱ्यांना पुढील उपचाराकामी सोलापूर येथे हलवले आहे.