बार्शी : बार्शी तालुक्यातील पुरी येथील वि. का.से.स. सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सोपल गटाने एक हाती सत्ता मिळवली. बुधवारी (ता. २०) सोसायटीची मतदान प्रक्रिया जि.प.प्रा. शाळा पुरी येथे पार पडली.
मतदान वेळ संपल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सोपल गटाचे सर्व १२ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन फटाक्याची आतिषबाजी केली. मतदान शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी दत्तुभाऊ झालटे, अशोक झालटे , मुकुंद झालटे, कमलाकर पाटील, मेजर किरण झालटे, राहुल पाटील, धनंजय झालटे, दिगंबर क्षिरसागर, मारुती उपरे व पांडु दिडवळ यांनी प्रयत्न केले.
Sopal group wins over Puri Society in Barshi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विजयी उमेदवारांचे माजी मंत्री दिलीप सोपल, युवराज काटे, नंदकुमार काशिद, बाळासाहेब तातेड, अॅड. बबन झालटे, श्रीराम घावटे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सचिन महाडिक यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवार सर्व साधारण गट :- विनोद झालटे, खंडेराव पाटील, सुखदेव झालटे, कल्याण दिडवळ, किसन झालटे, लालासाहेब दिडवळ, प्रदिप झालटे, कुंडलिक झालटे. सर्वसाधारण महिला :- संगीता पाटील, सौ. जयश्री झालटे इतर मागासप्रवर्ग :- शशीकांत उपरे अनुसुचित जाती जमाती :- दिलीप पालके