नागपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे विदर्भस्तरीय अधिवेशन येत्या रविवारी ( दि. 24) नागपूर येथे होत आहे. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या अधिवेशनाला विदर्भातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वनामती सभागृहात होणार्या या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विदर्भ विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख व प्रा.महेश पानसे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संघटनेने विभागस्तरीय अधिवेशन घेण्याची सुचना केली होती. मराठवाडा विभागाचे अधिवेशन लातूर येथे झाले. त्यानंतर विदर्भ विभागस्तरीय अधिवेशन नागपूर येथे वनामती सभागृह व्हीआयपी रोड धरमपेठ येथे रविवार दि. 24 एप्रिल रोजी होत आहे. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान होणार्या पहिल्या सत्रात स्मरणिका प्रकाशन आणि मान्यवरांचा गौरव होणार आहे.
Vidarbha Convention of Maharashtra State Press Association in Nagpur on Sunday
https://www.facebook.com/109399567404448/posts/525301159147618/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, खासदार अशोकराव नेते, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, आमदार विकास ठाकरे, आमदार राजाभाऊ पारवे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यासह राज्य पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे आदि उपस्थित राहणार आहेत.
दुसर्या सत्रात वृत्तपत्रांचे अर्थकारण या विषयावर चर्चा होणार आहे. यावेळी संपादक श्रीकृष्ण चांडक, माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, संपादक श्रीपाद अपराजीत, संपादक भास्कर लोंढे, संपादक सुदर्शन चक्रधर उपस्थित राहणार आहेत. विदर्भस्तरीय अधिवेशनाला माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विदर्भ पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी केले आहे.
□ सकाळी होणार नाव नोंदणी
विदर्भ स्तरीय व्दितीय अधिवेशनला उपस्थित राहणार्या राज्यभरातील पत्रकारांची नाव नोंदणी व अल्पोहार रविवारी (दि.24) सकाळी 9 ते 10 या वेळेत होणार आहे. पहिले सत्र संपल्यानंतर दुपारी 1 ते 2 या वेळेत भोजन होणार आहे. अधिवेशनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525469319130802/