□ डेथ इन कस्टडी प्रकरणी पीआयसह सातजणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : पोलीस कोठडीतील आरोपीला मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करून तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यातच सीआयडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला गुन्हा कबूल करण्यासाठी आणि गुन्ह्यातील मुद्देमाल देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीच्या पथकाने विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीबी प्रमुख असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह डीबी पथकातील पाच कर्मचाऱ्यांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आरोपीची घेतलेली पोलीस कोठडी पोलिसांनी अंगलट आली असून आता पोलिसांवरच पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525721235772277/
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अटकेत असलेला आरोपी भीमा रज्जा काळे (रा. भांबुरे पारधी वस्ती, कुडूवाडी, ता. माढा) याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या डेथ इन कस्टडी प्रकरणी विजापूर नाका गुरुवारी पोलिसात पो. नि. उदयसिंह पाटील, स.पो. नि. शीतलकुमार कोल्हाळ आणि ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय देशमुख नगरातील घरफोडी प्रकरणी भीमा रज्जा काळे (वय ४२, रा. भांबुरे पारधी वस्ती, कुडूवाडी, ता.माढा) याला विजापूर नाका पोलिसांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी अटक केली होती.
त्याचा तपास डी. बी. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांच्याकडे होता. त्याच दिवशी त्याला जिल्हा कारागृह येथून स.पो.नि. कोल्हाळ यांनी वर्ग करून ताब्यात घेऊन न्यायालयाकडून त्याला २५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करून घेतलेली होती.
पोलीस कोठडीत असताना भीमा यास तपासादरम्यान कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या पायाचे तळवे रक्तबंबाळ झाले होते. पोलिसांनीच त्याला उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
उपचारा दरम्यानचा त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर भीमा काळेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत याप्रकरणी कोल्हाळ आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Death in custody at Bijapur Naka police station, now only CID will handcuff the police
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या ‘डेथ इन कस्टडी’ चा सोपवण्यात आला होता. त्यानुसार याचा तपास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार याचा तपास पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे डीवायएसपी जी. व्हि दिघावकर यांच्याकडे देण्यात आला होता.
》गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण
अटक आरोपी भीमा रज्जा काळे याने घरफोडीचा गुन्हा कबूल करावा व घरफोडीत चोरीस गेलेला माल काढून द्यावा यासाठी सपोनि कोल्हाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली होती. असे सीआयडीने फिर्यादीत म्हंटले आहे.
》 उदयसिंह पाटलांचा हलगर्जीपणा नडला
या प्रकरणात तपासात विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी या गुन्ह्यातील तपासी अधिकारी कोल्हाळ यांना तपासामध्ये मार्गदर्शक सूचना दिल्याचे दिसून आले नाही. तपासिक अधिकाऱ्यांनी यातील आरोपी भीमा काळे यास त्यांच्यासमक्ष हजर केले. त्यावेळी तो हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे व निदर्शनास येऊन सुध्दा त्याला वैद्यकीय उपचारास पाठवले नाही. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याशिवाय विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
》 डी. बी. रुममध्ये केली होती मारहाण
आरोपी काळे याला मारहाण केल्याचा प्रकार हा विजापूर नाका पोलीस ठाण्यातील डीबी रुममध्ये घडला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ हे त्याच डी.बी. रुममध्ये बसतात. आरोपीचा तपासही त्याच रुममधून केला जात होता. कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळे याला बेदम मारहाण केली होती.
》 यांच्यावर दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी तत्कालीन पो.नि. उदयसिंह पाटील, तपासी अधिकारी स.पो.नि. शीतलकुमार कोल्हाळ, पो.ह.वा. श्रीरंग तुकाराम खांडेकर, पो.ना. शिवानंद दत्तात्रय भिमदे, पो.ना. अंबादास बालाजी गड्डम, पो.शि. अतिश काकासाहेब पाटील, व पो.ना. लक्ष्मण पोमु राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे श्रीशैल गजा यांनी फिर्याद दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525725429105191/