नागपूर : महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना ‘ब्लड बँके’तून रक्त देण्यात आले होते. मात्र यामुळे त्यांना HIV ची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे यात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रक्त देण्यात आलेली मुलं थॅलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त होती. Nagpur – 4 children infected with HIV, one dies of thalassemia
नागपूरच्या जरीपटका भागातील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. यामध्ये एका बालकाचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती डॉ. विकी रुघवानी यांनी दिली. यासंदर्भात आता आरोग्य विभागाने कठोर पावले उचलत चौकशी सुरू केली आहे. तसेच, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. आरोग्य प्रशासनाकडून चौकशी करण्यासाठी एक समिती गठन केली जाणार आहे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई होईल असं देखील सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक आर के धकाते यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, चार मुलांमध्ये एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एका रुग्णालयात थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त चार मुलांना आयएचव्ही संसर्गाने रक्त देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चारही मुलांना लागण झाली आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
Maharashtra| 4 thalassemic children tested positive for HIV in Nagpur allegedly after blood transfusion
4 children tested positive for HIV, out of them one died. Will take action against it. Inquiry will set up: Dr RK Dhakate, Asst Dy Director, Health Dept,State Govt (25.05) pic.twitter.com/M1nRG6PeOv
— ANI (@ANI) May 26, 2022
थॅलेसेमिया रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्त दिले जाते. त्यांना हे रक्त ब्लडबँकमधून मोफत पुरवले जाते. मात्र, हे रक्त देत असताना काही तपासण्यासुद्धा केल्या जातात. दूषित ब्लड दिल्याने पाच लहान बालकांना हेपेटायटिस बी तर चार लहान बालकांना एचआयव्ही असल्याचे समोर आले आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे, दूषित ब्लड दिल्याने एचआयव्हीचे संक्रमण झाल्याने एका बालकाचा मृत्यू झाला.
□ पालकांमध्ये संताप, तपासणी केलेले ब्लड न मिळाल्याने संकट
थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्त विकार आहे. हे एकतर अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे किंवा विशिष्ट मुख्य जनुकांमुळे होते. या विकारामुळे लाल रक्तपेशींचा नाश होतो आणि अशक्तपणा होतो. थॅलेसेमियाचा उपचार हा रोगाच्या प्रकार आणि तीव्रतेवर अवलंबून असतो.
मात्र या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. थॅलेसेमियामुळे आधीच चिंतेत असलेल्या पालकांवर एचआयव्हीमुळे संकट कोसळले आहे. काळजाच्या तुकड्याचे आता काय होणार? अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.
सरकारी रुग्णालयात एचआयव्हीसाठी औषध नसल्याची पालकांची तक्रार आहे. तपासणी केलेले ब्लड मिळाले असते तर आज माझ्या मुलीवर हे संकट आले नसते. एचआयव्हीची औषधे उपलब्ध नसतात. खर्चही खूप लागतो. असे होऊ नये, थॅलेसेमियाच्या रुग्णाला नॅट टेस्टड ब्लड दिले पाहिजे, अशी मागणी एचआयव्ही पीडित मुलीच्या आईने केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/548634176814316/