मुंबई : काँग्रेस नेते आणि ठाकरे सरकारचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना धक्का देणारी बातमी आहे. कदम यांचे सासरे, प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. 600 कोटींच्या डीएचएफल घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. दरम्यान, अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. CBI arrests Avinash Bhosale, father-in-law of Minister of State Vishwajeet Kadam
DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे होते. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तिंशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली. पुण्यातील बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस बंगला आहे. हाऊसच्या टेरेसवर भोसलेंच्या मालकीचं हेलिकॉप्टरदेखील आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आज गुरुवारी अटक केली. मागील काही दिवसांपासून अविनाश जाधव यांच्या शोधामध्ये सीबीआय होती. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुद्धा केलं होतं. त्यानंतर अविनाश जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सीबीआयने छापेमारी केली होती. मात्र, आता भोसलेंना अटक करण्यात आली असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
यापूर्वी देखील ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी जी गुंतवणूक केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. मात्र, सीबीआयने देखील त्यांच्या घरी आणि आजूबाजूच्या परिसरात छापेमारी केली होती. अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जातंय. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचं मोठं नाव आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी अविनाश भोसले यांची ओळख आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत.
जून २०२१ मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. परंतु भोसले यांच्यासोबत अजून त्यांच्या काही सहकार्यांचा सहभाग आहे का, याबाबत देखील सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे.