बुलढाणा : फक्त दिड वर्षाचा मुलगा फोटो दाखवले कि फोटोतील महापुरुष कोण आहे, हे तो सांगतो. बुलढाणा शहरातील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या आरोह पाटील हा अगदीच तीन महिन्यांचा असतांना त्याच्या आई डॉ. कल्याणी पाटील यांनी त्याला फ्लॅश कार्ड दाखवून महापुरुषांची ओळख करून दिलीय. ह्याच विशेष गोष्टीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतलीये. हा किताब पटकावणारा आरोह भारतातील सर्वात कमी लहान मुलगा आहे. One-and-a-half-year-old boy recognizes that the photo shows; His name appeared in India Book Buldhana Aroh Patil
ज्या वयात बोबडे बोल बोलता येत नाहीत, उभंही राहता येत नाही, अशा वयात दीड वर्षाच्या मुलाने कमाल केलीय. कोणत्याही महापुरुषाचे फोटो दाखवले की त्यांची नाव लगेच सांगतो.
त्याने एवढ्या लहान वयात मोठी कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये स्वतःचे नाव कोरले आहे. आरोह कोणत्याही कार्डावरील नाव पटकन सांगतो. आरोह अवघा दीड महिन्याचा असताना त्याच्या आईने त्याला फ्लॅशकार्डची ओळख करून दिली. त्यामुळे कार्डावरील फळे, फुले, गाड्या, मोठ्या व्यक्ती त्याला ओळखता आल्या. आता तर आरोह कोणत्याही कार्डवरील नाव चटकन सांगतो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549006080110459/
आरोहच्या आईवडिलांनी त्याचा व्हिडीओ तयार करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ला पाठवले. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ने आरोहची तत्काळ दखल घेतली. त्याचे व्हिडीओ बघून त्याला सुवर्णपदक दिले. हा किताब पटकावणारा आरोह हा देशातील सर्वात लहान मुलगा आहे.
आरोहच्या विक्रमाबद्दल त्याचे वडील सूरज पाटील म्हणाले, आरोहची आकलनशक्ती खूप चांगली आहे. तो साधारण दीड महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला फ्लॅशकार्ड दाखवून चित्रांची ओळख करून दिली. त्यानंतर तो बऱ्याच गोष्टी चटकन ओळखू शकतो.
आरोह लहान असतानाच त्याला फ्लॅश कार्ड दाखवून चित्रांची ओळख करवून दिली. त्यात महापुरुष, जनरल असं सर्वकाही होतं. आता तो सहजपणे कार्डवरील नावं पटापट सांगतो. त्यानं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविल्यानं आम्हा सर्वांना त्याचा खूप अभिमान वाटतो.
□ मुरूडचा जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद
#Murud #janjira #fort #Closed #surajyadigital #जंजिरा #किल्ला #सुराज्यडिजिटल #बंद #पर्यटक #tourist
■ पर्यटकांसाठी मुरूडचा जंजिरा किल्ला बंद करण्यात आला आहे. बदलत्या वातावरणामुळे समुद्राच्या वाढणाच्या लाटा प्रवेश द्वाराजवळ धडकत आहेत. त्यामुळे प्रवेशद्वारातून उतरताना पर्यटकांना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुरातत्व खात्याने हा निर्णय घेतला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी 5 लाख पर्यटक भेट देत असतात. अशी माहिती अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/548737110137356/