सोलापूर : पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून जाणाऱ्या 4 जणांना रेल्वेने धडक दिली. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. त्यामुळे हे 4 ही जण दारू पित बसले असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. Pandharpur: Three Bihari laborers killed in train collision, bottles found on track
यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यापैकी एकाची उपचारादरम्यान प्राणज्येत मालवली. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात की घातपात याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. हेमलाल गोविंद ठाकूर (वय ३०), पंकज रामचरण मिरवी (वय २४) व सोनू तुलाराम यादव (वय १८) असे तिघांचा मृताची नावे असून गोकूल फुलसिंग मिरवी (वय २०) या तरुणावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594625108881889/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचं कळतं. पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरुन जाणाऱ्या चार बिहारी मजुरांना रेल्वेने धडक दिली. हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे.
■ विवाहित महिलेची आत्महत्या
सोलापूर – फौजदार चावडी परिसरातील स्नेहसृष्टी पार्क येथील विहिरीत एका ५० वर्षीय विवाहित महिलेने उडी टाकून आत्महत्या केली.ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.