सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा मार्गावरील एकलासपूरजवळ कार आणि मोटार सायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील २ जण ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री घडला. अपघाताचे वृत्त समजताच मंगळवेढा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात मयत झालेले दोघेही मंगळवेढा येथील आहेत. आण्णासाहेब दत्तात्रय सावंजी (वय २२ वर्षे) आणि विजय दादासाहेब सावंजी (वय २२ वर्षे ) हे दोघे त्यांच्या मोटार सायकलवरून पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे जात होते.
एकलासपूरजवळ मंगळवेढ्याकडून येणाऱ्या कारसोबत मोटार सायकलची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कार अपघातात चिमुकली मुलीसह महिला जागीच ठार ; पाच जण गंभीर जखमी
सोलापूर : सोलापूर – पुणे महामार्गावर पुण्याकडे निघालेल्या होंडा सिटीकार विरुद्ध दिशेला पलटी खात जाऊन सोलापूरकडे निघालेल्या इनोव्हा कार व कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक विवाहित तरुणी जागीच मयत झाली. तसेच एक चिमुकली मुलगी मयत झाली तर पाचजण जखमी झाले.
हा अपघात काल सोमवारी (ता.22) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास भोइंजे पाटीजवळ (ता.माढा) येथे घडला. होंडा सिटी कार (क्र. एम. एच-१२आर. के – ४७५४) ही कार पुण्याकडे निघाली होती. या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरून पलटी होत विरुद्ध दिशेला गेली. नंतर ती सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरला (क्र-एम.एच-१२ टी.व्ही-६५७८) व इनोव्हा कारला (क्र-एम.एच.१३-ए.झेड-२५२९) धडकली.
या अपघातात माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय-३०, रा.सोलापूर ) ही जागीच मयत झाली. तर सानवी मयूर पाटील (वय-७ ) ही पंढरपूर येथे उपचारा दरम्यान मयत झाली. तसेच मयूर मल्लिनाथ पाटील (वय-३३),संगीता मयूर पाटील (वय-३०) व मीरा मल्लिनाथ चितकोटी (वय-३) तसेच एनोव्हा कारमधील सलीम सय्यद (वय-३०) व दिलीप गायकवाड (वय-७०, सर्वजण रा.सोलापूर ) हे जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथे व किरकोळ जखमींना टेंभुर्णी येथे दाखल केले. या अपघातात होंडा सिटी कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील एएसआय अभिमान गुटाळ,पोहेकॉ मकबूल तांबोळी,पोकॉ प्रसाद काटे व हायवे स्टाफच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारास पाठविले.
□ पाणी समजून केले कीटकनाशकाचे प्राशन
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंगरूळ येथे निपाणी विजय फडतरे (वय- 28, राहणार अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर ) हिने डोकेदुखीची गोळी खाऊन त्यावर पाणी समजून कीटकनाशकाचे मिश्रण करून ठेवलेले पाणी प्राशन केले. नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी पती विजय फडतरे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.