मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गणपतीचे दर्शन आणि सदिच्छा भेट, असे या भेटीचे स्वरुप होते. यात गणपतीचे दर्शन घेऊन राजकीय मैत्रीचा अनोखा श्रीगणेशा झाल्याचे म्हंटल जातंय. Chief Minister Eknath Shinde meets Raj Thackeray, Ganesha’s darshan and political friendship?
या भेटीत शिंदे आणि ठाकरे यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे, राज्यात उत्सावाच आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणरायाचं दर्शन घेतलं बाकी काहीच चर्चा झाली नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहेत.
महाराष्ट्रातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झालं आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी भेठी दिल्या आहेत. या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राज्यातील सत्ताबदलनानंतर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यात नुकताच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बंडखोरीनंतर शिंदे गटावर विलीनकरणाची वेळ आली तर त्यांना मनसेत विलीन होता येऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र त्यावेळी मनसे नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनेक भाजप नेत्यांनी घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली नव्हती.
□ भेटीवर भेटी, युतीचे संकेत
निवडणुकीसाठी युती करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र वारंवार होणाऱ्या हायप्रोफाईल बैठकावरून अंदाज लावला जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. याच्या एक दिवस आधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही राज यांची भेट घेतली होती. तर, मनसे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मलबार येथील निवासस्थानी पोहोचले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राज यांच्या पक्षाला सोबत घेऊन सेनेची मराठी व्होटबँक स्वत:ची बनवू शकते, असा विश्वास भाजपला असल्याचे बोलले जात आहे.