● शिक्षणाधिकारी बँकेत जावूनही थंडा प्रतिसाद
सोलापूर : सोलापुरातील महाराष्ट्र बँकेने निधी वळवल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांना गणवेशापासून वंचित राहावे लागल्याची बाब उघड झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. Zilla Parishad Education Officer deprived of uniform due to bank scandal, students left in Solapur
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. हा निधी सोलापुरातील महाराष्ट्र बँकेकडे जमा होतो मात्र हा निधी आलेला जिल्हा परिषद प्रशासनाला न करता तो इतरत्र वळविल्याने विद्यार्थ्यांना गणवेशापासून तब्बल तीन महिने वंचित राहावे लागले होते. याबाबत लोहार यांनी पत्रकारांना माहिती
शिक्षणाधिकारी लोहार याविषयावर अधिक माहिती देताना म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शासनातर्फे गणवेश देण्यात येतो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. यंदा शाळा सुरू झाले आहेत त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा असे शासनाचे धोरण होते. पण शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी लोटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने पालकांमधून ओरड सुरू झाली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी गणवेश खरेदीस विलंब का होतो आहे याची तपासणी केली. शिक्षण विभागाचे महाराष्ट्र बँकेत खाते आहे. गणवेशासाठी ठेवलेली रक्कम बँकेने शिक्षकाच्या विशेष वेतनासाठी वळविली असल्याचे दिसून आले.
वास्तविक शिक्षण विभागाने चालू वर्षासाठी गणवेश अनुदान बीआरसी स्तरावर पी एफ एम एस प्रणालीतून लिमिट सेट करण्यासंदर्भात २५ मे रोजी बँकेला कळवले होते. त्यानंतर सात जून रोजी विशेष शिक्षकांचे मानधन या प्रणालीतून सेट करण्यासाठी सांगितले होते. पण या पत्रांमुळे विशेष शिक्षकाचे मानधन सेट न झाल्यामुळे शिक्षकांच्या मानधनाची रक्कम गणवेश अनुदानातून खर्च टाकली गेली आहे.
बँकेला कळवूनही त्यांनी गणवेशाच्या रकमेची तजवीज केली नाही. त्यामुळे बँकेच्या विभागीय कार्यालयात शिक्षण अधिकारी लोहार स्वतः गेले व झालेली चूक निदर्शनास आणली. पण बँकेने याला प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या लोहार यांनी बँकेवर कारवाई करण्याची तंबी दिली. त्यानंतर मात्र बँकेत एकच खळबळ उडाल्याचे सांगितले.